ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 21 - रशियाचे संयुक्त राष्ट्राचे राजदूत व्हिटली चर्कीन यांचे त्याच्या ६५ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सोमवारी निधन झाले. रशियन पराराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत अधिक स्पष्टीकरण देण्यात आले नाही; मात्र खासगी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार रशियन दूतावासातच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तत्काळ मॅनहटॅन रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यांचे निधन झाले. दरम्यान, राष्ट्रपती पुतिन यांनी चर्कीन यांच्या निधनानंतर शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, ते मुत्सदी असल्याचे म्हटले आहे.
१९९0 मध्ये तत्कालीन सोव्हियत युनियनच्या परराष्ट मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणून चर्कीन आंतरराष्ट्रीय पटलावर आले. सोव्हियत युनियनच्या पतनानंतरही त्यांनी या मंत्रालयावरील पकड ठेवली होती. त्यांनी उप परराष्ट्रमंत्री, त्यांनंतर राजदूत म्हणून बेल्जीयम, कॅनडा व त्यानंतर संयुक्तराष्ट्रात काम पाहीले.