रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात एक मोठा दावा करण्यात आला आहे. द सनने दिलेल्या एका वृत्तानुसार, रशियन समर्थकांनी युक्रेनच्या खार्किववर 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' टाकल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या बॉम्बसंदर्भात बोलायचे झाल्यास, हा जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब आहे, यामुळे 44 टन टीएनटी एवढा भीषण स्फोट होऊ शकतो.
खरे तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओच्या आधारे, 'फादर ऑफ ऑल बॉम्ब'चा वापर केल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये एका निवासी भागात मोठा स्फोट होताना दिसत आहे. स्फोटानंतर आगीचा गोळा दिसतो आणि नंतर धुराचे लोट पसरतात. मात्र, युक्रेन अथवा रशियाकडून यासंदर्भात कसल्याही प्रकारची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
रशियाच्या समर्थकांचा दावा -रशियाचे समर्थक सोशल मीडिया आणि टेलिग्राम चॅनलवर दावा करत आहेत की, रशियाने युद्धाच्या अडीच वर्षांनंतर पहिल्यांदाच 'फादर ऑफ ऑल बॉम्ब'चा वापर केला आहे. मात्र, यासंदर्भात तज्ज्ञांची मते वेगवेगळी आहेत. रशियन लष्करी तज्ज्ञांच्या मते, हा ODAB-9000 व्हॅक्यूम बॉम्ब असू शकतो, ज्याला फादर ऑफ ऑल बॉम्बदेखील म्हटले जाऊ शकते. तर काहींच्या मते, हा स्फोट थर्मोबॅरिक बॉम्ब ODAB-1500 च्या वापरासारखा दिसत आहेत.
या व्हिडिओच्या आधारे केला जातोय दावा... -
एक्सपर्ट्स की राय बंटीतसेच काही तज्ज्ञांच्या मते, एवढ्या शक्तिशाली आणि महागड्या बॉम्बचा वापर पुतीन एखाद्या रिकाम्या ठिकाणी करणार नाही. हा स्फोट FAB-3000 अथवा FAB-1500 सारख्या बॉम्बचा असू शकतो, असेही मानले जात आहे. रशिया-युक्रेन युद्ध जवळपास 32 महिन्यांपासून सुरू आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये या युद्धाला सुरुवात झाली होती.