Russia vs Ukraine War: रशियात आण्विक युद्धाचा सराव सुरु; रशियातील मीडियाच्या दाव्याने खळबळ, धाबे दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:06 PM2022-02-28T18:06:46+5:302022-02-28T18:14:39+5:30
रशिया-यूक्रेन युद्धात आता रशियाचंही मोठं नुकसान होत असल्याची माहिती समोर येत आहे.
रशिया-यूक्रेन यांच्यातील युद्धाला ५ दिवस उलटले आहेत. अद्यापही बलाढ्य रशियासमोर हार मानण्यास यूक्रेन तयार नाही. यूक्रेनही ताकदीनं आणि युक्तीनं रशियाविरोधात हल्ला करत आहे. त्यामुळे यूक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याची दमछाक उडताना दिसून येत आहे. आज रशियाने युक्रेनच्या खेरसन आणि खारकीव प्रांतात पुन्हा हल्ले केले. रशियाने खेरसन आणि कारकीवमध्ये मिसाईल हल्ले केले. या मिसाईल हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे.
रशिया-यूक्रेन युद्धात आता रशियाचंही मोठं नुकसान होत असल्याची माहिती समोर येत आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. रशियन सैन्यातील ४३०० हून अधिकजणांना प्राण गमवावे लागले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तर, रशियाच्या हल्ल्यात ११६ मुलांसह १६८४ नागरीक जखमी झाले असल्याचे युक्रेनने सांगितले. तर, जीवितहानीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचा निषेध म्हणून अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र त्यामुळे रशियाला फारसा फरक पडला नाही. यानंतर अमेरिकेसह युरोपियन देशांनी युक्रेनचा लष्करी मदत देण्यास सुरुवात केली. आता तब्बल २८ देशांनी रशियाविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. याचदरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा धोका पाहता रविवारी Nuclear Deterrent Forceला अलर्ट राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता आण्विक हल्ल्याचं संकट उभं राहत आहे. रशिया मीडियाने केलेल्या दाव्यानूसार रशिया सैन्यानं आण्विक हल्ल्याचा सराव सुरु केला आहे. रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सर्गेई शोइगु यांनी त्यांचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनाही याबाबत माहिती दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाकडे जगात सर्वाधिक ५ हजार ९७७ अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे या रशिया मीडियाच्या दाव्यानंतर जगभरात धाबे दणाणले आहे.
Russia vs Ukraine War: रशियाने ताब्यात घेतली पृथ्वीवरील सगळ्यात धोकादायक जागा; ३१ वर्षांपूर्वी घडला होता अपघात https://t.co/RPHgus5S97#RussiaUkraineWar
— Lokmat (@lokmat) February 28, 2022
पुतीन यांना झटका-
रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचा निषेध म्हणून अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र त्यामुळे रशियाला फारसा फरक पडला नाही. यानंतर अमेरिकेसह युरोपियन देशांनी युक्रेनचा लष्करी मदत देण्यास सुरुवात केली. आता तब्बल २८ देशांनी रशियाविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
पाश्चिमात्य देशांनी रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. युरोपियन युनियननं रविवारी याबद्दलची घोषणा केली. संघटनेच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयेन यांनी याबद्दलची माहिती दिली. रशियाची विमानं, रशियात नोंद झालेली विमानं आणि रशियाचं नियंत्रण असलेल्या विमानांचा यात समावेश आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देशांचा समावेश आहे. युरोपियन युनियनसोबतच कॅनडानंही रशियन विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे.