रशियात अण्वस्त्रांच्या सुरक्षा प्रमुखाची हत्या; ईलेक्ट्रीक स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:44 IST2024-12-17T13:37:41+5:302024-12-17T13:44:58+5:30

लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव हे रशियाचे अण्वस्त्र, जैविक आणि रासायनिक दलांचे प्रमुख होते. किरिलोव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

Russia's nuclear weapons security chief igor kirilov assassinated; bomb planted in electric scooter | रशियात अण्वस्त्रांच्या सुरक्षा प्रमुखाची हत्या; ईलेक्ट्रीक स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवला

रशियात अण्वस्त्रांच्या सुरक्षा प्रमुखाची हत्या; ईलेक्ट्रीक स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवला

रशियाच्या अण्वस्त्रांच्या शस्त्रागाराची सुरक्षा करणाऱ्या फोर्सच्या प्रमुखाची बॉम्ब हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. एका इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. क्रेमलिनपासून अवघ्या ७ किमीवर ही घटना घडली आहे. 

युक्रेनने बॅलेस्टिक मिसाईलने रशियावर हल्ला केल्यामुळे पुतीन चिडले होते. त्यांनी अण्वस्त्र हल्ला करण्याची तयारी सुरु केल्याचे वृत्त होते. अशातच रशियाची जगाला हादरवून सोडविण्याची ताकद असलेली अण्वस्त्र शक्ती ज्या व्यक्तीच्या सुरक्षेत होती त्याचीच हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव हे रशियाचे अण्वस्त्र, जैविक आणि रासायनिक दलांचे प्रमुख होते. किरिलोव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. रशियन चॅनेलवर याबाबतची दृष्ये दाखविली जात आहेत. दरवाजा आणि बाजुला असलेल्या बर्फामध्ये दोन मृतदेह दिसत आहेत. रशिया तपास यंत्रणांनी याचा तपास सुरु केला आहे. 

युक्रेनने काही काळापूर्वी रशिया रासायनिक अस्त्रांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. रशिया युरोपवर हल्ल्याची तयारी करत असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याने पुतीन यांच्या योजनांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. 

Web Title: Russia's nuclear weapons security chief igor kirilov assassinated; bomb planted in electric scooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.