शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शाहिद अब्बासी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 3:14 AM

सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्याने पायउतार व्हावे लागलेल्या नवाज शरीफ यांच्यानंतर, पंतप्रधानपदाचे उत्तराधिकारी म्हणून सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम

इस्लामाबाद : सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्याने पायउतार व्हावे लागलेल्या नवाज शरीफ यांच्यानंतर, पंतप्रधानपदाचे उत्तराधिकारी म्हणून सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीगने (नवाज) शनिवारी त्यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांची निवड केली. मात्र, पंतप्रधान होण्यासाठी शाहबाज यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहावर (मजलिस-ए-शूरा) निवडून येणे आवश्यक असल्याने, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुमारे दीड महिन्यासाठी शाहिद खाकन अब्बासी यांनी हंगामी पंतप्रधानपद सांभाळावे, असेही पक्षाने ठरविल्याचे वृत्त आहे.पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार संसदेचा सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही. शरीफ यांना पद सोडावे लागले असले, तरी पक्ष त्यांच्या मुठीत असल्याने, तूर्तास अब्बासी व नंतर शाहबाज शरीफ ही व्यवस्था प्रत्यक्षात आणण्यास अडचण येईल, असे वाटत नाही.संसदेचे सदस्य असलेले ५८ वर्षांचे अब्बासी शरीफ यांचे निष्ठावंत असून, नवाज यांनी राजीनामा देईपर्यंत ते मंत्रिमंडळात तेल आणि नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री होते. शाहबाज यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा व आपल्या बंधुंच्या अपात्रतेने रिक्त लाहोरची जागा लढवायची, असे धोरण पक्षाने ठरविले असल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)