पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर (Panama Paper) लीकनं जगभरातील अनेकाना मोठा धक्का दिला होता. या पेपर लीकमधून अनेक बड्या व्यक्तींच्या बनावट कंपन्या आणि कर चोरीची प्रकरणं समोर आली होती. परंतु आता पुन्हाएकदा ICIJ नं (इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट) आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. याचा पर्दाफाश केल्यानंतर भारतातील बड्या व्यक्तींनी त्यावर तोडगा काढण्यास सुरूवात केली होती. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि उद्योजक अनिल अंबानी यांच्या नावाचाही समावेश आहे.
जगभरातील १.१९ कोटी दस्तऐवजांची माहिती शोधल्यानंतर ही आर्थिक रहस्य जगासमोर आणलं आहे. ICJI नं दिलेल्या माहितीनुसार पँडोरा पेपरच्या तपासात ११७ देशांतील ६०० रिपोर्टर्सचा समावेश होता. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार अनिल अंबानी यांनी ब्रिटनच्या न्यायालयात स्वत:ला दिवाळखोर घोषित केलं होतं, त्यांच्याकडेही परदेशात १८ कंपन्या असल्याचं म्हटलं आहे.
माजी कर आयुक्तांचाही समावेशयापैकी अनेकांच्या विरोधात पहिल्यापासून तपास सुरू आहे, तर काहींवर कारवाईचा बडगाही उचलण्यात आला आहे. दरम्यान, या यादीत काही माजी खासदारांच्या नावाचाही समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे कर चोरीशी निगडीत १४ सेवा प्रदातांच्या दस्तऐवजांमध्ये अशाही लोकांचं नाव आहे ज्यांचं काम हे थांबवणं होतं. यामध्ये माजी रेव्हेन्यू सर्व्हिस ऑफिसर, माजी कर आयुक्त आणि मादी सैन्य अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
आणखी कोणाची नावं?यामध्ये केवळ भारतच नाही तर जगभरातील अनेक लोकांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये जॉर्डनचे राजा, युक्रेन, केनया, इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर यांचाही समावेश आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे काही मंत्री आणि भारत, रशिया, अमेरिका, मेक्सिकोसह१३० अब्जाधिशांची नावंही यातून समोर आली आहे. याशिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्र्यांपासून त्यांच्या निकवर्तीयांची अशी ७०० जणांची नावंही यात आहे.