सिडनी : सचिन तेंडुलकरचा समावेश ‘ब्रॅडमन हॉल ऑफ फेममध्ये’होताच त्याच्या शिरपेचात बुधवारी आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. ऐतिहासिक सिडनी क्रिकेट मैदानावर भव्य भोजन सोहळ्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याचाही ‘ब्रॅडमन हॉल ऑफ फेममध्ये’ समावेश करण्यात आला.
ब्रॅडमन फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या सोहळ्याला सचिनची उपस्थिती लक्षणीय होती. सचिनच्या खेळाचे तंत्र पाहून मला माङया खेळाची आठवण येते असे गौरवोद्गार खुद्द ब्रॅडमन यांनीच एकदा काढले होते. मी सचिनमध्ये माझी झलक पाहतो, असेही ते म्हणाले होते.
ब्रॅडमन यांच्या 9क् व्या जन्मदिनी सचिनने त्यांची अॅडिलेड येथील निवासस्थानी भेट घेतली होती. नंतर ब्रॅडमन यांनी सचिनला आपल्या सर्वकालीन एकादशमध्ये स्थान दिले. 1998 साली ही भेट झाली. त्यावेळी शेन वॉर्न हा देखील सोबत होता. ब्रॅडमन यांच्याशी आधी कोण बोलेले याबाबत दोघांच्याही मनात भीती होती. सचिन म्हणाला, ‘आम्ही दोघे कारमध्ये होतो. ब्रॅडमन यांच्या घराकडे जात असताना वॉर्नला मी म्हणालो, तू ऑस्ट्रेलियाचा असल्याने आधी तू सवाल केलेला बरा. पण वॉर्नचे मत होते की तू फलंदाज असल्यामुळे तू आधी बोलला तर बरे होईल.’ 24 वर्षाच्या शानदार कारकीर्दीत सचिनने एमसीजीवर पाच कसोटी सामने खेळले आणि त्यात तीन षटके ठोकली.
सचिन म्हणाला,‘ ब्रॅडमन यांना मी सवाल केला. ‘तुम्ही आज खेळला असता तर तुमची सरासरी काय असती? त्यांनी या प्रश्नावर विचार केला आणि उत्तर दिले,‘ शक्यतोवर 7क्! यावर मी म्हणालो,‘ 7क् का, 99 का नाही? ते ताबडतोब म्हणाले,‘7क् वर्षाच्या म्हाता:यासाठी ही सरासरी वाईट नाही.’ (वृत्तसंस्था)