न्यू यॉर्क : अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याच्या आधी मी ‘डोनाल्ड ट्रम्प फाउंडेशन’ बरखास्त करणार असल्याची माहिती नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. पुढील महिन्यात ट्रम्प अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील त्यामुळे अध्यक्षपद आणि फाउंडेशन यांच्या हितसंबंधात काही अडथळे येऊ नयेत यासाठी ते बरखास्त करीन असे ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात या फाउंडेशनने पैसा खर्च केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर न्यू यॉर्कच्या सरकारी वकिलाच्या कार्यालयाने फाउंडेशनची चौकशी केली. ट्रम्प यांनी निवेदनात म्हटले आहे की डोनाल्ड ट्रम्प फाउंडेशन बरखास्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश मी माझ्या वकिलाला दिले आहेत. मी अध्यक्षपदासाठी खूप वेळ व ऊर्जा देईन आणि देश व जगा समोर असलेले अनेक प्रश्न सोडवीन. चांगल्या कामाला कुठल्या तरी हितामुळे (फाउंडेशन) अडथळा यायला नको, असे मला वाटते. (वृत्तसंस्था)
डोनाल्ड ट्रम्प फाउंडेशन शपथविधी आधी बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2016 12:42 AM