इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये बसून भारतात दहशतवादी कृत्ये करणारा हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सैयद सलाउद्दीनला अमेरिकेने जागतिक दहशतवादी ठरविल्यानंतर पाकिस्तान त्याच्या पाठीशी उभा राहिला आहे. ‘न्याय्य हक्कासाठी काश्मिरी जनतेने स्वयंस्फूर्तीने चालविलेल्या लढ्याला पाठिंबा देणाऱ्या’ कोणावरही दहशतवादीचा शिक्का मारणे असमर्थनीय आहे. भारतीय लष्कर काश्मिरींच्या आकांक्षा चिरडून टाकण्यास त्यांच्यावर अत्याचार करीत आहे, असा आरोप पाकिस्तानने केला.सलाउद्दीन भारतव्याप्त काश्मिरात?सलाउद्दिनला जगातिक दहशतवादी जाहीर करणाऱ्या अमेरिका सरकारच्या अधिकृत आदेशात सलाउद्दिन ‘भारतव्याप्त काश्मीरमध्ये’ दहशतवादी कारवाया करीत असल्याचा उल्लेख आहे याकडे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना लक्ष वेधले व भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरचा असा आक्षेपार्ह उल्लेख होऊनही मोदी सरकारने गप्प बसावे, यावर टीका केली. यावरून भाजपाचा राष्ट्रवाद बेगडी आहे व तो फक्त टीव्हीवरील दिखाऊ चर्चांपुरताच आहे, हेच स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी टिष्ट्वटरवर केला.ज्येष्ठ भाजपा नेते व्यंकय्या नायुडू यांनी लगेच सुरजेवाला यांच्यावर प्रतिहल्ला केला आणि मोदींच्या यशस्वी अमेरिका दौऱ्याने पोटशूळ उठल्यानेच काँग्रेस अशी थिल्लर टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याचे राजकारण न करण्याचे आवाहनी त्यांनी केले.
सलाउद्दीनवर दहशतवादी शिक्का नको
By admin | Published: June 28, 2017 12:32 AM