लंडन - जगातील अनेक कंपन्यांमध्ये सध्या नोकर कपातीचे वातावरण आहे. पाश्चिमात्य देशांतील काही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना घरी बसविले आहे. मात्र, अशा वातावरणात . एक जण वेगळ्याच कारणामुळे हैराण झाला आहे. त्याला १ कोटी रुपये वार्षिक पगार आहे. परंतु, काम काहीही नाही. त्यामुळे बोअर झाल्याचे म्हणतो.
हा प्रकार घडला आहे आयर्लंडमध्ये. डर्माट मिल्स असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो आयरिश मेलमध्ये वित्त व्यवस्थापक या पदावर कामाला आहे. त्याला वार्षिक १ लाख पाच हजार पाउंड म्हणजे जवळपास १ कोटी रुपये वार्षिक पगार आहे. त्याला कार्यालयात काहीही काम दिले जात नाही, अशी त्याची तक्रार आहे. क्वचितच एखादा ई-मेल आल्यास तो तातडीने उत्तर देऊन दिलेले काम पूर्ण करतो. त्याच्या तक्रारीबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान त्याने ही माहिती दिली. कंपनीनेही त्याच्या तक्रारीला दुजोरा दिला असून, त्याला याबाबत दुष्परिणाम भोगावा लागलेला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मिल्सच्या कंपनीत पाच दिवसांचा आठवडा आहे. तसेच तेथे हायब्रीड कार्यपद्धती अवलंबिल्या गेली आहे. ३ दिवस तो घरातून २ दिवस कार्यालयात जाऊन काम करतो. ऑफिसमध्ये गेल्यावर सँडविच खाणे, वर्तमानपत्र वाचणे, दररोजचे ई-मेल तपासणे ही कामे तो सर्वप्रथम करतो. त्याच्याशी कार्यालयीन कामासंबंधी ई-मेल, मेसेज वा संवाद केला जात नाही.
यामुळे बाजूला सारले?कंपनीतील चुकीच्या अकाउंटिंग प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वरिष्ठांनी त्याला कोणतेही काम दिलेले नाही.