बैरूत : इसिस या दहशतवादी संघटनेचा आणखी एक विकृत उद्योग संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधीने उघड केला असून, ज्या महिलांना इसिसकडून अटक झालेली आहे त्यांची खुलेआम विक्री केली जात असल्याचे युनोच्या प्रतिनिधीने म्हटले आहे. इसिसकडून ताब्यात घेतलेल्या महिला व मुले यांचे दरपत्रक जाहीर केले जात असून, मध्यपूर्वेतील लोक व इसिसचे योद्धे या महिलांना विकत घेतात, असे युनोने म्हटले आहे. ‘द ब्लूमबर्ग’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार युनोच्या प्रतिनिधी झैनब बांगुरा यांनी एप्रिल महिन्यात इराकला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी महिलांचे दरपत्रक स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आहे. इसिसच्या ताब्यात किती महिला आहेत हेही या पत्रकात लिहिले होते. (वृत्तसंस्था)
इसिसकडून महिलांची विक्री
By admin | Published: August 05, 2015 11:06 PM