दुपबई - एक म्हण आहे, देव जेव्हा देतो, तेव्हा छप्पप फाडके देतो. एका भारतीयासाठी ही म्हण सत्य सिद्ध झाली आहे. या युवकाचं नाव आहे, सुनील कुमार कथूरिया. 33 वर्षीय सुनील कुमार कथूरियाने दुबई येथे एक लॉटरी जिंकली आहे. त्याने तब्बल 1 मिलियन अमेरिकन डॉलरचा इनाम जिंकला आहे. अर्थात त्याला जवळपास 7 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे.
सेल्समन म्हणून करतो काम - गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कथूरिया मनामा येथे एका खासगी कंपनीसाठी काम करतो. तो तेथे सेल्समन म्हणून काम करतो. 1 मिलियन डॉलर जिंकणारा तो 342 वा व्यक्ती ठरला आहे. सुनीलने 17 ऑक्टोबरला लॉटरीचे हे तिकीट ऑनलाईन विकत घेतले होते. डीडीएफ मिलेनियम मिलियनेयर ड्रामध्ये 1 मिलियन अमेरिकन डॉलर जिंकणारा तो 170 वा भारतीयदेखील आहे.
अनेक वर्षांपासून करतोय काम -सुनीलने सांगितले, की तो बहरीन येथे राहणारा दुसर्या पिढीतील प्रवासी आहे. त्याला दुबईत जवळपास 10 ते 12 वर्ष झाले आहेत. त्याने सांगितले, की या पैशांचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याची माझी इच्छा आहे. यातील काही रक्कम दान करण्याचीही इच्छा आहे. तसेच एक घर विकत घेण्याचीही त्याची इच्छा आहे. यासंदर्भात तो त्याच्या आई आणि वडिलांशीही चर्चा करणार आहे.