शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

सलमान रश्दी यांच्या यकृताला दुखापत, व्हेंटिलेटरवर ठेवले, डाेळाही धाेक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 6:12 AM

Salman Rushdie : न्यूयॉर्क येथे एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात सलमान रश्दी यांच्यावर हादी मतार या हल्लेखोराने धारदार शस्त्राने १५ हून अधिक वार केले.

न्यूयॉर्क : दि सॅटनिक व्हर्सेस या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी (वय ७५) यांच्यावर शुक्रवारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे ते एक डोळा गमाविण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या यकृतालाही दुखापत झाली आहे. पेनसिल्वानिया येथील एका रुग्णालयामध्ये रश्दी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. 

न्यूयॉर्क येथे एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात सलमान रश्दी यांच्यावर हादी मतार या हल्लेखोराने धारदार शस्त्राने १५ हून अधिक वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना हवाई रुग्णवाहिकेने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रश्दी यांच्यावरील हल्ला भयानक व निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी व्यक्त केली आहे. हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार केल्याने रश्दी यांच्या यकृताला दुखापत झाली आहे.  

हादी मतार (२४) हा हल्लेखोर न्यू जर्सी येथील फेअर व्ह्यू भागातील रहिवासी आहे. त्याला लगेचच अटक करण्यात आली. इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशरी गार्ड कॉर्प्सच्या ध्येय-धोरणांविषयी हादी याला आस्था आहे. (वृत्तसंस्था)

हल्लेखोर खोमेनींच्या विचारांचा समर्थक?सलमान रश्दी यांनी दि सॅटनिक व्हर्सेस हे पुस्तक लिहिल्यानंतर इराणचे तत्कालीन प्रमुख आयातुल्ला खोमेनी यांनी त्यांच्याविरोधात मृत्युदंडाचा फतवा १९८९ मध्ये जारी केला होता. तेव्हापासून रश्दी यांच्यावर हल्ल्याचे संकट घोंगावत होते. रश्दी यांच्यावर हल्ला करणारा हादी मतार खोमेनी यांच्या विचारांचा समर्थक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

‘सॅटनिक’वर बंदीचा निर्णय योग्य : सिंहकायदा व सुव्यवस्थेच्या कारणांपायी देशाचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सलमान रश्दी यांच्या दि सॅटनिक व्हर्सेस या पुस्तकावर १९८८ मध्ये बंदी घातली होती. हा निर्णय योग्य होता, असे तत्कालीन परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांनी म्हटले आहे. या पुस्तकाविषयी लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. त्यामुळे बंदी घालणे योग्य ठरेल, असे के. नटवरसिंह यांनी राजीव गांधी यांना सांगितले होते.  

टॅग्स :Salman Rushdieसलमान रश्दीAmericaअमेरिका