नवी दिल्ली : युक्रेनवर हल्ला केला म्हणून रशियावर लावण्यात आलेले आर्थिक निर्बंध हे सामूहिक विनाश घडविणाऱ्या आर्थिक शस्त्रांसारखीच आहेत, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. युक्रेनवरील हल्ल्याला विरोध केला पाहिजेच; पण अशा निर्बंधांमुळे निर्माण होणारी जोखीमही नजरेआड करता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.राजन म्हणाले की, युद्धामुळे जागतिक राजकीय व्यवस्था अस्थिर झाली आहे. आर्थिक निर्बंधांमुळे रशियाच्या हल्ल्याचा विस्तार होऊ शकतो. पूर्ण क्षमतेने लावलेले आर्थिक निर्बंध हीसुद्धा सामूहिक विनाशाची शस्त्रेच आहेत. ही शस्त्रे इमारती अथवा पूल कोसळवत नाहीत. तथापि, ते कंपन्या, वित्तीय संस्था, उपजीविका यांसह जीवनेही उद्ध्वस्त करतात.
...तर सर्वच प्रक्रिया उलटेलरघुराम राजन यांनी म्हटले की, आर्थिक शस्त्रांचा वापर घातकच आहे. त्यांचा व्यापक प्रमाणात वापर झाला तर आधुनिक जगात भरभराट आणणारी जागतिकीकरणाची प्रक्रिया ते उलटवू शकतात. ही जोखीम नजरेआड करून चालणार नाही.