बोस्टन : अमेरिकेच्या अटलांटिक शहरात आयोजित वाळू कलाकृती-2क्14 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांना त्यांच्या ‘वृक्ष वाचवा भविष्य वाचवा’ या कलाकृतीसाठी ‘पीपल्स चॉईस’ बक्षिसाने सन्मानित करण्यात आले.
‘पहिल्या अमेरिकी वाळू कलाकृती विश्वचषक स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना बक्षीस मिळाल्याने मी खुश आहे. माङया कलाकृतीला पसंत करणा:यांचा व तिच्यासाठी मत देणा:या सर्वाचा मी आभारी आहे, अशा भावना पटनायक यांनी व्यक्त केल्या.
अटलांटिक शहराच्या महापौरांनी पटनायक यांना ‘पीपल्स चॉईस’चे पदक प्रदान केले. या स्पर्धेत जगभरातील 2क् प्रतिष्ठित वाळू शिल्पकार सहभागी झाले होते. 19 जून रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रत्येक कलाकाराला 1क् टन वाळूपासून 3क् तासांमध्ये आपली कलाकृती बनवायची होती. पटनायक यांनी अमेरिकी शिल्पकार मॅथ्यू रॉय डॅबर्ट यांच्या सोबतीने मिश्र स्पर्धेतही सहभाग घेतला होता. दोघांनी मिळून ताजमहलची प्रतिकृती बनविली. या स्पर्धेत ते पाचव्या स्थानी राहिले. यावर्षी पद्मश्री पुरस्कार मिळविणा:या पटनायक यांनी 5क् हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि सोहळ्यांमध्ये सहभाग घेतला असून अनेक पुरस्कार पटकावले आहेत. ताज्या मुद्यांवर, सामाजिक जागृतीसाठी झटणारे कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. पुरी येथे जन्मलेले पटनायक तेथे वाळू कला विद्यालय चालवितात. (वृत्तसंस्था)