शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अलास्कात सॅन्डर्स विजयी, हिलरी पराभूत

By admin | Published: March 28, 2016 12:53 AM

अमेरिकी अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळविण्याच्या प्रक्रियेत डेमोक्रॅटस्चे सिनेटर बर्नी सॅन्डर्स यांनी अलास्का, वॉशिंग्टन आणि हवाई कॉकसमध्ये हिलरी क्लिंटन यांना पराभूत करून

वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळविण्याच्या प्रक्रियेत डेमोक्रॅटस्चे सिनेटर बर्नी सॅन्डर्स यांनी अलास्का, वॉशिंग्टन आणि हवाई कॉकसमध्ये हिलरी क्लिंटन यांना पराभूत करून त्यांच्यातील मताधिक्य कमी केले आहे. मतमोजणी झालेल्या एकूण मतांपैकी सॅन्डर्स (७४) यांना वॉशिंग्टनमध्ये ७२ टक्क्यांपेक्षा जास्त तर अलास्कात ८० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली; मात्र डेलिगेटस्चा विचार करता ६८ वर्षीय हिलरी यांचे मताधिक्य अजूनही कायम आहे. वॉशिंग्टन या महत्त्वपूर्ण राज्यात त्यांना पराभवाची झळ सोसावी लागल्याने त्यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. वॉशिंग्टन राज्यात १०० पेक्षा जास्त डेलिगेटस् आहेत. त्यातील एक मोठा हिस्सा सॅन्डर्स यांच्या बाजूने वळला आहे. हवाई येथे अमेरिकी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच निवडून गेलेल्या हिंदू तुलसी गब्वार्ड यांनी सॅन्डर्स यांना समर्थन दिले होते. त्यांनी सॅन्डर्स यांना पाठिंबा देण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला होता. त्या सॅन्डर्स यांच्यासोबत एका जाहिरातीतही दिसतात. अलास्कात सॅन्डर्स यांच्या पत्नीने काही दिवस प्रचार केला होता. तेथे १६ डेलिगेटस् आहेत. वॉशिंग्टन आणि अलास्कात प्रायमरी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सॅन्डर्स आपल्या समर्थकांना उद्देशून बोलताना म्हणाले की, आमच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून त्याचा आता कोणीही इन्कार करू शकत नाही. आमची स्थिती आता सुधारत आहे. आम्ही विजयाच्या मार्गावर आहोत. आता विस्कोंसिन येथे पाच एप्रिल रोजी प्रायमरी निवडणूक होत आहे. (वृत्तसंस्था)