वॉशिंग्टन : बर्नी सँडर्स यांनी डेमोक्रॅटिकच्या उमेदवार आणि प्रमुख दावेदार हिलरी क्लिंटन यांचा कंसास आणि नेबरास्कात कॉकसमध्ये पराभव केला, तर लुइसियाना राज्यात हिलरी यांचा विजय झाला. सुपर ट्यूजडेनंतर बर्नी सँडर्स हे तसे बरेच मागे पडले होते, तर हिलरी यांनी उमेदवारीच्या दावेदारीसाठी अगोदरच मोठा पल्ला पार केला आहे; पण आता दोन राज्यांत मिळालेल्या विजयामुळे सँडर्स यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढील मुकाबला आता माइनेत होणार आहे. सँडर्स यांनी या विजयाला राजकीय क्रांती, असे संबोधले आहे, तर मिळालेल्या विजयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या प्रायमरी निवडणुका लुइसियाना आणि कंसाससह पाच राज्यांत झाल्या. ट्रम्प यांची घोडदौड रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी लुईसियानात विजय मिळविला असून, केंटुकीत ते आघाडीवर आहेत, तर रिपब्लिकनचे अन्य एक उमेदवार टेड क्रूज यांनी ट्रम्प यांना टक्कर देत कंसास व मेन येथे विजय मिळविला आहे. अन्य दोन रिपब्लिकन उमेदवार मार्को रुबियो आणि जॉन कासिच यांच्यासाठी हे निकाल फारसे समाधानकारक राहिले नाहीत.
कंसास, नेबरास्कात सँडर्स विजयी
By admin | Published: March 07, 2016 3:01 AM