न्यूयॉर्क : अमेरिकेत महत्त्वपूर्ण न्यूयॉर्क प्रायमरीपूर्वी अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटच्या उमेदवारीच्या शर्यतीत सामील असलेले बर्नी सँडर्स यांनी वायओमिंगमध्ये हिलरी क्लिंटन यांच्याविरुद्ध आपल्या विजयाची मालिका चालूच ठेवली, तर रिपब्लिकन उमेदवारीचे दावेदार टेड क्रूझ यांनी कोलोरॅडोन सर्व डेलिगेटस् जिंकून डोनॉल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध विजय नोंदविला.न्यूयॉर्क येथील प्रायमरी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना हा विजय सॅण्डर्स आणि क्रूझ यांच्यासाठी उत्साह वाढविणार आहे. न्यूयॉर्क येथील प्रायमरी १९ एप्रिल रोजी होणार आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वर्मोटचे सिनेटर सँडर्स (७४) यांनी गेल्या ९ लढतीत आपला हा ८ वा विजय मिळविला आहे. यात एका लढतीत परदेशात राहणाऱ्या डेमोक्रॅट समर्थकांच्या मतांचीही मोजणी झाली होती.
वायओमिंगमध्ये सँडर्स विजयी, हिलरी पराभूत
By admin | Published: April 11, 2016 2:20 AM