शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पार्टीत दारू संपली म्हणून सॅनिटायझरने नशा केली; सात जाणांचा मृत्यू, दोघे कोमात

By बाळकृष्ण परब | Published: November 22, 2020 2:07 PM

International News : पार्टीदरम्यान, दारू संपल्याने पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी नशेसाठी सॅनिटायझर प्राशन केले. मात्र सॅनिटायझर पिल्याने लोकांची तब्येत अचानक बिघडली.

ठळक मुद्देरशियातील तातिन्सकी जिल्ह्यामधील तोमतोर गावातील एका पार्टीत घडला प्रकार पार्टीदरम्यान, दारू संपल्याने पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी नशेसाठी सॅनिटायझर प्राशन केलेबेशुद्ध पडत असलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे ७ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण कोमामध्ये गेले

मॉस्को - व्यसन हे वाईट असते, असे वारंवार सांगितले जाते. बऱ्याचदा अशा व्यसनाची चटक जीवावरही बेतू शकते. असाच एक प्रकार रशियातील तातिन्सकी जिल्ह्यामधील तोमतोर गावातील एका पार्टीत घडला आहे. येथे सुरू असलेल्या पार्टीदरम्यान, दारू संपल्याने पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी नशेसाठी सॅनिटायझर प्राशन केले. मात्र सॅनिटायझर पिल्याने लोकांची तब्येत अचानक बिघडली. बेशुद्ध पडत असलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे ७ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण कोमामध्ये गेले.मिळालेल्या माहितीनुसार या पार्टीत सहभागी झालेल्या लोकांनी सॅनिटायझर प्राशन केले होते. त्यामध्ये ६० टक्के मिथेनॉल होते. ज्याचा वापर कोरोनाच्या संक्रमणकाळात हँड क्लिनर म्हणून करण्यात येत होता.डेलीमेलमधील रिपोर्टनुसार रशियातील तातिन्सकी जिल्ह्यातील तोमतोर गावात पार्टीदरम्यान, लोक बेशुद्ध पडून कोसळू लागल्याने गोंधळ माजला. हे सर्व लोक पार्टीमध्ये मद्याची मागणी करत होते. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या कुणीतरी सॅनिटायझरची बातटी आणली. मद्यासाठी आतूर झालेल्या लोकांनी हे सॅनिटायझर पिले. त्यानंतत तब्येत बिघडून तीन जणांचा जाग्यावरच मृत्यू झाला. तर सहा जणांना एअरक्राफ्टच्या मदतीने स्थानिक राजधानी याकुत्स्क येथे नेण्यात आले.तिथे उपचारादरम्यान अजून चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सॅनिटायझरच्या माध्यमातून विषबाधेबद्दल गुन्हा दाखल केला.या घटनेनंतर रशियन सरकारने नशा करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांत रशियामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. रशिामध्ये आतापर्यंक कोरोनाचे २० लाख ६४ हजार ७४८ रुग्ण सापडले आहेत. तर ३५ हजार ७७८ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :russiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीय