टोकिओ, दि. - असे म्हणतात की, प्रेम आंधळे असते. जपानच्या राजकुमारीच्या बाबतीतही काहीसे असेच घडत आहे. एखाद्या परिकथेमधील गोष्ट प्रत्यक्षात घडावी तसेच जपानमध्ये घडताना दिसत आहे. जपानची राजकन्या माको एका सामान्य जपानी नागरिकासोबत लग्न करणार आहे. एका सर्वसामान्य युवकासोबत लग्न करणार असल्याचे जपानची राजकुमारी माको हीने रविवारी जाहीर केले. जपानच्या सम्राटाकडून परवानगी मिळाल्यानंतर राजकन्या माकोने आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. रविवार घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजकन्या माको म्हणाली, कोमूरोच्या हास्याकडे ती आकर्षित झाली होती. मला लहानपणापासून माहित होते की, लग्नानंतर मी शाही दर्जा गमवणार आहे. तेव्हा माको ही कोमूरोला गपचूप पाहत असे, असे माकोने सांगितले.
या घोषणेनंतर लग्नाची लांबचलक प्रक्रिया सुरू होईल. जपानच्या राजवंशी घराणे हे पुरूषप्रधान संस्कृती मानणारे आहेत. त्यामुळे त्याच्या नियमानुसार या लग्नासाठी माकोला आपला राजेशाही दर्जा सोडावा लागणार आहे. या वादग्रस्त परंपरेनुसार माको सर्वसामान्य युवकांशी लग्न करणार असल्यामुळे तिला राजवंशातील अन्य महिलांना मिळणारा खास दर्जा मिळणार नाही. पण हा नियम राजवंशातील पुरूषांना लागू नाही.जपानच्या राजेशाही कुटुंबातील प्रिंस अकिसीनो आणि कीको यांची मुलगी माको 25 वर्षांची आहे. माको एका सामान्य कुटुंबातील मुलाच्या प्रेमात पडली आहे. कोमुरो (25) नावाचा हा तरुण पदवीधर आहे आणि एका बीचवर पर्यटन कर्मचारी आहे. एखाद्या चित्रपटाचे कथानक जसे वळण घेते तसेच या ठिकाणीही घडत आहे. माको - कोमुरो यांची पहिली भेट पाच वर्षांपूर्वी एका कॉमन मित्राच्या माध्यमातून एका पार्टीत झाली होती. त्यानंतर हे दोघे प्रेमात पडले आणि आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
तथापि, या दोघांनी एका चर्चमध्ये विवाह केला असल्याचीही चर्चा आहे. विवाहापूर्वी येथील पादरीने माको हिला सांगितले होते की, विवाहानंतर ती राजकुमारी राहणार नाही. एका सामान्य व्यक्तीप्रमाणे तिला जीवन जगावे लागेल. पण, माको मागे हटली नाही आणि तिने कोमुरोशी विवाह केला. माकोच्या कुटुंबियांचाही या विवाहाला विरोध नाही. रीतीरिवाजाप्रमाणे या दोघांचा विवाह करून देण्यात येणार आहे. माको या कुटुंबातील अशी पहिली मुलगी आहे जी राजेशाही घरातून बाहेर पडून विद्यापीठात जाऊन शिकली आहे.