केप कॅनाव्हेरल (अमेरिका) : गुरू ग्रहाभोवतीच्या आणखी १२ चंद्रांचा शोध लागला असून, त्या भोवतीच्या एकूण चंद्रांची संख्या विक्रमी ९२ झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक ८३ चंद्र शनीभोवती आहेत, अशी माहिती होती; परंतु याबाबतीत आता गुरूने शनीला आता मागे टाकले आहे. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या मानयर प्लॅनेट सेंटरने अलीकडे जारी केलेल्या अहवालात गुरू ग्रहाभोवती आणखी १२ चंद्र असल्याचे म्हटले आहे.
मूळ जाणू शकणार -एप्रिल महिन्यात युरोपियन स्पेस एजन्सी गुरू ग्रह आणि त्याच्या काही मोठ्या, बर्फाळ चंद्रांचा अभ्यास करण्यासाठी एक यान पाठवणार आहे.
पुढील वर्षी नासा गुरूच्या चंद्रांचा अभ्यास करण्यासाठी युरोपा क्लिपर नामक मोहीम राबविणार आहे. आगामी काळात या बाह्य चंद्रांपैकी प्रत्येकाचा आपण अभ्यास करून त्यांचे मूळ जाणू शकणार आहोत.
आकार किती मोठा? - नवीन चंद्र आकाराने ०.६ मैल ते २ मैल (१ किलोमीटर ते ३ किलोमीटर) एवढे- गुरूच्या नवीन चंद्रांना अद्याप नावे दिलेली नाहीत. निम्मे चंद्र नाव देण्याइतपत मोठे.
चंद्रांची संख्या आणखी वाढणार २०२१ आणि २०२२ मध्ये हवाई आणि चिलीमधील दुर्बिणींच्या साहाय्याने प्रदीर्घ काळ निरीक्षणे नोंदवल्यानंतर या नवीन चंद्रांचा शोध लागला. दोन्ही ग्रहांच्या चंद्रांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. - स्कॉट शेपर्ड, ‘कार्नेगी’ संस्था
कसे तयार झाले चंद्र? : एकेकाळी मोठे चंद्र एकमेकांवर किंवा धूमकेतूवर किंवा लघुग्रहांवर आदळून त्यांचे लहान चंद्र झाले असावेत.