वॉशिंग्टन - आपल्या सौरमालेतील सर्वात अनोख्या ग्रहांबद्दल बोलायचे झाले तर त्यात शनीचे नाव प्रथम येते, कारण या ग्रहाला स्वतःचे एक कडे (रिंग) आहे. पण आता हे कडे हळूहळू नाहीसे होत आहे.
शनीवरचे वातावरण त्याचे बर्फ आणि खडकांपासून बनलेले कडे नष्ट करत आहे. शनीवर पडणारा बर्फ दररोज इतका वितळतो की, त्यातून एक ऑलिम्पिक जलतरण तलाव भरू शकतो. यावरून किती वेगाने हे कडे नष्ट होत आहे हे समजू शकते.
‘जेम्स’ येऊ शकते कामीशनीचे कडे किती वेगाने नाहीसे होत आहे आणि ते पूर्णपणे कधी नाहीसे होईल? याचे नेमके उत्तर अद्याप सापडलेले नाही. पण आता ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ या कड्यांच्या नष्ट होण्याविषयी माहिती देऊ शकते.
आम्ही या कड्यांच्या नष्ट होण्याच्या गतीचा मागोवा घेत आहोत. सध्याच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की शनीचे कडे पुढील काही दशलक्ष वर्षे त्याचा एक भाग असतील, नंतर नाही. - जेम्स ओडोनोग्यू, शास्त्रज्ञ, अंतराळ संशोधन संस्था, जपान