न्यूयॉर्क : महिला कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या विधानावरून वादाला तोंड फुटताच मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांनी माफी मागत आपण व्यक्त केलेले मत पूर्णत: चुकीचे असल्याची कबुलीही दिली.कॉम्प्युटर क्षेत्रातील महिला या विषयावरील परिषदेत मायक्रोसॉफ्टच्या संचालक मारिया क्लावे यांनी सत्य नाडेला यांना मुलाखतीदरम्यान असा प्रश्न विचारला होता की, नोकरीत पुढे जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या महिला वेतनवाढीबाबत बोलण्यात कचरतात? त्यांना काय सल्ला द्याल? त्यावर नडेला यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या कार्यक्रमाच्या संयोजक आणि मायक्रोसॉफ्टच्या संचालक मारिया क्लावे यांनी तात्काळ नाडेला यांच्या मतावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पुरुषांच्या बरोबरीने वेतन मिळविण्यासाठी महिलांनी तयारी करावी, असे आवाहनही मारिया क्लावे यांनी करताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांना प्रतिसाद दिला. नोकरदार महिलांबद्दल त्यांनी केलेल्या या विधानावरून वादळ उठताच सत्य नाडेला यांनी माफी मागत आपण व्यक्त केलेले मत पूर्णत: चुकीचे असल्याची कबुलीही दिली. नाडेला यांनी टिष्ट्वटवर याबाबत स्पष्टीकरण देताना नमूद केले की, महिलांनी वेतनवाढीची मागणी कशी करावी, यासंदर्भात मी स्पष्ट मत व्यक्त करू शकलो नाही. वेतनाच्या बाबतीत पुरुष-महिला असा भेदभाव केला जाऊ नये. (वृत्तसंस्था)
सत्य नाडेला यांनी अखेर माफी मागितली
By admin | Published: October 11, 2014 4:07 AM