ओस्लो : भारताचे बालहक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना इतर 11 नोबेल विजेत्यासह बुधवारी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. नोबेल विजेते स्वीडनची राजधानी स्टॉकहोम व नॉव्रेची राजधानी ओस्लो येथे जमले असून, तिथे झगमगत्या समारंभात त्याना नोबेल पुरस्कार दिले जातील. माझा पुरस्कार भारतातील मुलांना अर्पण असे सत्यार्थी यानी म्हटले असून वेळोवेळी मुलांच्या हक्कांबाबत जलद न्यायालयात निकाल देणा:या भारतीय न्यायव्यवस्थेचेही त्यानी कौतुक केले आहे. भारत सरकारही मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबाबत पावले उचलेल असा आशावाद सत्यार्थी यांनी प्रगट केला आहे. सत्यार्थी यांच्याबरोबर प}ी सुमेधा, मुलगा, सून व मुलगी यांच्यासह ओस्लो येथे आले आहेत.
नोबेल विजेते
फ्रान्सचे साहित्यिक पॅट्रिक मोदियानो यांना साहित्याचे नोबेल , अमेरिकन ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन ओ कीफी, नॉव्रेचे पती-प}ी एडवर्ड व मे ब्रिट मोसर यांना वैद्यकीय नोबेल, जपानी शास्त्रज्ञ इसामु अकासाकी, हिरोशी अमानो , जपानी अमेरिकन शुजी नाकामुरा यांना भौतिक शास्त्रचे नोबेल दिले जाणार आहे.
अमेरिकेचे एरिक बेटङिाग व विल्यम मोरेनर व जर्मन शास्त्रज्ञ स्टीफन हेल यांना रसायनशास्त्रचे नोबेल दिले जाणार असून फ्रान्सचे जॉन तिरोल यांना अर्थशास्त्रचे नोबेल दिले जाणार आहे. (वृत्तसंस्था)
च्ओस्लो- नोबेल शांतता पुरस्काराने मुलांच्या हक्कासाठी लढण्याची एक मोठी संधी आम्हाला दिली आहे असे हा पुरस्कारविजेते कैलाश सत्यार्थी व मलाला युसुफझाई यांनी पुरस्कार समारंभाच्या पूर्वसंध्येस बोलताना सांगितलेआहे.
च्एक मूल जरी धोक्यात असेल तरीही संपूर्ण जग धोक्यात असेल असे सत्यार्थी म्हणाले . मलालाबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
च्सत्यार्थी व मलाला यांना पुरस्काराअंतर्गत 11 लाख डॉलरची रक्कम विभागून मिळणार आहे. हा पुरस्कार बालपण नाकारले गेलेल्या लाखो मुलांसाठी अत्यंत महत्वाचा आहे, असे ते म्हणाले.