सना : इराण समर्थित बंडखोरांना लक्ष्य करीत अरब आघाडीच्या हवाई हल्ल्यात येमेनमध्ये १५ ठार झाले. येमेनच्या राजधानीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंदाधुंद बॉम्बवर्षावात सना आणि इतरत्र १५ बंडखोर समर्थक सैनिक मारले गेले.शिया बंडखोर व माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्या समर्थक सैनिकांवर चौथ्या रात्री कारवाईदरम्यान सौदीच्या हल्ल्यांमुळे विमानतळाचे नुकसान झाले. सनावर बंडखोरांचा ताबा आहे.सूत्रांनी सांगितले की, सौदीच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू झाल्यापासून प्रथमच धावपट्टीला लक्ष्य करण्यात आले आहे. दरम्यान, सना येथील अल सुबहा तळावर बंडखोरांच्या रिपब्लिक गार्डच्या मुख्यालयावर रात्रभर झालेल्या हवाई हल्ल्यांत १५ सैनिक मारले गेले, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्याने दिली.भारतीय मदतीच्या प्रतीक्षेतयेमेनमध्ये अडकलेल्या लोकांचा एक गट तेथून बाहेर पडण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडून मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. जिदो नामक व्यक्तीने सांगितले की, महिला आणि मुलांसह ६० लोकांचा समूह भीती आणि चिंतेत एका फ्लॅटमध्ये राहत आहे. राजधानी सनासह येमेनच्या विविध प्रांतात सुमारे ३,५०० भारतीय वास्तव्य करीत आहेत. यात अधिकतर परिचारिका आहेत. (वृत्तसंस्था)
सौदीचा हवाई हल्ला; येमेनमध्ये १५ बंडखोर ठार
By admin | Published: March 30, 2015 1:22 AM