शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

चुकीला माफी नाही! सौदीत पुढच्या १० दिवसांत १२ जणांचं शिर धडावेगळं करणार, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 2:33 PM

सौदी अरबमध्ये पुढील १० दिवसांत १२ लोकांना मृत्यूदंड देण्यात येणार आहे. या गुन्हेगारांचे शिर धडापासून वेगळे केले जाईल.

गेल्या अनेक काळापासून सौदी अरब त्यांच्याकडील अजब आणि क्रूर शिक्षेसाठी प्रसिद्ध आहे. सौदीमध्ये कठोर कायदे आणि नियम आहेत. ज्यामुळे कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगाराला सोडलं जात नाही. परंतु अलीकडच्या काळात सौदीत दिल्या जाणाऱ्या शिक्षांमध्ये काही कमी करण्यात आली आहे. मात्र पुन्हा एक अशी बातमी समोर आली आहे. ती ऐकताच कुणाचेही अंग भीतीने थरथर कापेल. 

सौदी अरबमध्ये पुढील १० दिवसांत १२ लोकांना मृत्यूदंड देण्यात येणार आहे. या गुन्हेगारांचे शिर धडापासून वेगळे केले जाईल. यातील काही असे आहेत ज्यांची मान तलवारीने कापणार आहेत. निश्चितपणे आजच्या काळात अशी भयानक शिक्षेचा कुणी विचार करू शकत नाही. परंतु आधुनिक युगात वाटचाल करणारा सौदी अरब देश त्यांच्या क्रूर प्रथांना सोडू शकत नाही. 

इंग्रजी वृत्तपत्र टेलिग्राफनुसार, सौदी अरबमध्ये ज्या १२ जणांचे शिर धडावेगळं करणार आहे त्यात बहुतांश परदेशातील लोकांचा समावेश आहे. त्यात ३ पाकिस्तानी, ४ सिरियाचे, २ जॉर्डनचे राहणारे आहेत. त्यात ३ सौदीच्या नागरिकांचाही समावेश आहे. या सर्वांवर ड्रग्स संबंधित कायद्याचं उल्लंघन करण्याचा आरोप होता. या गुन्ह्याखाली त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. 

मार्च महिन्यात सौदी अरब सरकारने ८१ लोकांचा मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचे आदेश दिले. त्यात अनेक दहशतवादी संघटनांशी जोडलेले आहेत. सौदी अरबच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. २०१८ मध्ये सौदी अरबनं या शिक्षांमध्ये घट करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यांच्यावर हत्या अथवा मारहाणीचा आरोप असेल त्यांनाच अशी शिक्षा दिली जाईल असं ठरलं होतं. मोहम्मद बिन सलमान यांनी म्हटलं होतं की, मृत्यूदंडाची शिक्षा कमीत कमी लोकांना देता येईल यावर सरकार चर्चा करत आहे. त्यानंतर सौदीत २ वर्षांनी अशी क्रूर शिक्षा दिली जात आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सातत्याने न्यायव्यवस्थेत बदल करण्याची चर्चा करतात. 

या वर्षी सर्वाधिक लोकांना मृत्यूची शिक्षा मिरर या इंग्रजी वेबसाइटनुसार, २०२२ मध्ये २२ नोव्हेंबरपर्यंत १३२ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या वर्षीचा आकडा गेल्या वर्षी २०२१ आणि २०२० पेक्षा जास्त आहे. सौदी अरेबियाकडून अशा शिक्षेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कारणास्तव सौदी अरेबियामध्ये मृत्यूच्या शिक्षेची प्रकरणे कमी करण्याची देखील चर्चा आहे, परंतु सरकार या प्रकरणात पूर्णपणे पुढे जाण्यास सक्षम नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाDrugsअमली पदार्थ