शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीला विदर्भात पुन्हा धक्का?; भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून चिंताजनक आकडेवारी समोर
2
आरोग्यमंत्री सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; पोलीस घटनास्थळी, आरोपींचा शोध सुरू
3
भाजपाचे ६ शिलेदार, प्रचारापासून नियोजनाची सगळी जबाबदारी; निवडणुकीत किती जागा लढणार?
4
महायुतीतील नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, देवेंद्र फडणवीसांचा भाजप नेत्यांना सल्ला
5
Share Market Opening 13 September: नफावसूलीचा दबाव, ऑल टाईम हाय वरून घसरला शेअर बाजार; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला
6
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, Video शेअर करत व्यक्त केला संताप
7
तरुणांसाठी महत्त्वाची बातमी: 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रमासाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी, गावातूनच कमवा १० हजार रुपये
8
'हास्यजत्रा' की 'चला हवा येऊ द्या'? प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
9
यंदाचे गणेश विसर्जन दणक्यात; ढोल-ताशा वादनावरील निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आनंददायी व यशदायी दिवस, मोठा आर्थिक लाभ संभवतो!
11
Hindenburg on Adani : हिंडेनबर्गनं अदानींवर फोडला आणखी एक बॉम्ब, आता स्विस बँकेशी जोडलं कनेक्शन; म्हटलं...
12
भाजपाची रणनीती, विरोधकांच्या प्रयत्नांना चाप; नितीन गडकरी महाराष्ट्रात येणार?
13
जागतिक आर्थिक केंद्राचे मुंबईचे स्वप्न दृष्टिपथात; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-MMRDA त सामंजस्य करार
14
धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला; ८५० कुटुंबांना घरे, ३००० झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार
15
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच तालवाद्यात झाले रेकॉर्ड
16
नऊ वर्षांनी एसटीला बाप्पा पावला; ऑगस्टमध्ये १६.८६ कोटींचा महसूल, सर्वाधिक नफा
17
कच्च्या तेलाच्या किमतीवर नजर, 'ही' आहे दरकपातीची अट; पेट्राेल-डिझेल स्वस्त? 
18
आरोग्य सुविधांपासून आर्थिक अडचणीमुळे वंचित राहू नये, यासाठी ही योजना मदतकारी ठरो!
19
नेत्यांच्या मुलांवर तिकिटात मेहेरबानी; मुख्यमंत्रिपदासाठी खासदारांमध्ये चढाओढ
20
देशातील निवडणुकीत प्रथमच झाले पेपरलेस मतदान; आयोगाची भोपाळमध्ये कमाल

सौदी अरबियाने 39 हजार पाकिस्तानींची केली हकालपट्टी

By admin | Published: February 08, 2017 11:32 AM

सौदी अरबिया या मुस्लिम बहुल देशाने गेल्या 4 महिन्यात तब्बल 39 हजार पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं आहे.

ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 8 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यावर निर्बंध घालण्यावर बरीच टीका झाली. मात्र, आता  सौदी अरबिया या मुस्लिम बहुल देशाने गेल्या 4 महिन्यात तब्बल 39 हजार पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं आहे. 
 
व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत केवळ 4 महिन्यातच सौदी सरकारने 39 हजार पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवल्याची माहिती आता समोर आली आहे. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांना देशात येण्याची परवानगी देण्याआधी त्यांची कसून चौकशी करण्यात यावी असा आदेश देण्यात आला आहे, कारण त्यांच्याचीतल काहींचा संबंध इसिस या दहशतवादी संघटनेशी असू शकतो अशी शंका सौदी सरकारला आहे अशी माहिती सौदी सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.  
 
याशिवाय काही पाकिस्तानी नागरिकांना अंमली पदार्थ तस्करी, चोरी, फसवणूक, आणि मारामारीसारख्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शूरा काऊन्सिलच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष अब्दुला अल-सादो यांनी पाकिस्तानी नागरिकांना कामावर ठेवण्याआधी त्यांची योग्य ती तपासणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
 
 याखेरीज, सौदीमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची इत्यंभूत माहिती मिळवण्याच्ये आदेश दिले आहेत. याबरोबरच कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाचा राजकीय आणि धार्मिक कल कोणत्या बाजूने आहे, हे जाणून घेणे गरजेचं असल्याचं मत त्यांनी नोंदवलं  आहे.