रियाध - कठोर शिक्षा देण्यासाठी कुख्यात असलेल्या सौदी अरेबियामध्ये सध्या एका महिला कार्यकर्तीचा शिरच्छेद करण्याची तयारी सुरू आहे. एकीकडे महिला कार्यकर्त्यांच्या सुटकेच्या मागणीवरून सौदी अरेबिया आणि कॅनडामधील संबंध बिघडलेले असतानाच सौदी अरेबियाने या कठोर शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. आता या महिला कार्यकर्तीला शिरच्छेद करून मृत्युदंड देण्यात येईल. 29 वर्षीय महिला कार्यकर्ती इसरा अल-घोमघम या महिला कार्यकर्तीला तिचा पती मूसा अल हाशिम याच्यासोबत डिसेंबर 2015 रोजी अटक करण्यात आली होती. या दोघांना पूर्व कातिफ प्रांतात अरेबियन क्रांतीनंतर सरकारविरोधी आंदोलन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दरम्यान, रियाध येथील विशेष फौजदारी न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान, सरकारी पक्षाने इरसा आणि अन्य पाच आरोपींना दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत शिरच्छेदाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, आरोपी कार्यकर्त्यांनी या निकालाविरोधात दाद मागितली आहे. त्यावर ऑक्टोबरमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. जर शिक्षा कायम राहिली तर या शिक्षेला मंजुरीसाठी राजे सलमान यांच्याकडे पाठवण्यात येईल. मात्र जर्मनीस्थित यूरोपियन सौदी ऑर्गनायझेशन फॉर ह्युमन राइट्सच्या (ESOHR) म्हणण्यानुसार घोनघन ह्या एक प्राख्यात महिला कार्यकर्त्या आहेत. तसेच त्यातून महिला कार्यकर्त्यांविरोधात चुकीचे उदाहरण समोर ठेवले जात आहे. घोनघम यांचीत त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी ESOHR ने केली आहे. मात्र सौदीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप तरी मौन बाळगले आहे.
सौदी अरेबिया पहिल्यांदाच महिला कार्यकर्तीचा शिरच्छेद करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 2:05 PM