आपल्या देशातील अनेकजण व्यवसाय आणि कामासाठी सौदी अरेबियामध्ये जातात, सौदी अरेबियाने परदेशी कामगारांसाठी मोठा बदल केला आहे. यामुळे आता याचा परिणाम भारतावरही होणार आहे. सौदी सरकारच्या अधिकृत वेबसाइट 'सौदी गॅझेट'नुसार, सरकारने परदेशी घरगुती कामगारांच्या भरतीसाठी जारी केलेले व्हिसाचे नियम कडक करण्याचा प्रयत्न केला आहे.
वाऱ्याची झुळूक येताच डोलू लागते बिल्डिंग; पाहा जगातील सर्वात बारीक इमारत
सौदीच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या मते, नवीन नियमांनुसार, सौदी अरेबियातील अविवाहित पुरुष किंवा महिला कामासाठी परदेशी कामगारांची नियुक्ती करणे थोडे कठीण झाले आहे. आता कोणताही अविवाहित सौदी नागरिक २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच परदेशी नागरिकाला घरगुती कामासाठी ठेवू शकतो. या अटींची पूर्तता झाल्यानंतरच त्या परदेशी कामगाराला व्हिसा दिला जाईल.
सौदी अरेबियाचा हा निर्णय भारतासाठीही महत्त्वाचा ठरतो कारण दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय कामानिमित्त सौदी अरेबियात जातात. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानुसार, सौदी अरेबियामध्ये सुमारे २६ लाख भारतीय काम करतात. आता सौदी अरेबियातील २४ वर्षांखालील अविवाहित नागरिकांच्या घरी भारतीयांसह परदेशी कामगारांना गृह सहायक म्हणून काम करता येणार नाही.
अहवालानुसार, सौदी अरेबियाने देशांतर्गत कामगार बाजार सुव्यवस्थित आणि नियमन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सौदीच्या मानव संसाधन मंत्रालयाने क्लायंटसाठी Musaned प्लॅटफॉर्म देखील स्थापित केला आहे. येथे त्यांचे अधिकार, कर्तव्ये आणि संबंधित कामाची माहिती दिली जाईल. या व्यासपीठाच्या माध्यमातूनच कामगारांना व्हिसा देण्याची आणि कामगारांमध्ये वाटाघाटी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सौदी अरेबियामध्ये कामासाठी २६ लाख भारतीय
याशिवाय, STC Pay आणि Urpay द्वारे कामगारांना पगार हस्तांतरित करण्याची सुविधा मुसानेड प्लॅटफॉर्मवरच प्रदान करण्यात आली आहे. घरगुती कामगार करारांचे प्रमाणीकरण आणि विवादांचे निराकरण यांसारख्या सुविधा देखील आहेत. म्हणजेच, हे व्यासपीठ सौदी अरेबियामध्ये घरगुती कामगारांच्या भरतीसाठी अधिकृत व्यासपीठ प्रदान करते. त्याचा उद्देश भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे तसेच मालक आणि कामगार यांच्यातील कोणत्याही प्रकारचे वाद सोडवणे आणि दोघांचे हक्क सुनिश्चित करणे हा आहे.
घरगुती कामगारांच्या विविध श्रेणी आहेत. यामध्ये नोकर, चालक, सफाई कामगार, स्वयंपाकी, रक्षक, शेतकरी, शिंपी, लिव्ह-इन नर्स आणि ट्यूटर यांचा समावेश आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय नोकरीसाठी सौदी अरेबियात जातात. सौदी अरेबियामध्ये सुमारे २६ लाख भारतीय काम करतात.