ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 5 - दहशतवाद पसरवणे व प्रादेशिक शांतता भंग करणे या कारणांवरून सौदी अरेबिया, युएई, बहारिन व इजिप्तने कतारशी राजनैतिक संबंध तोडले आहेत. या सर्व देशांनी कतारवर दहशतवादाला समर्थन दिल्याचा आरोप लावला आहे. बहारिनने सोमवारी कतारसोबत आपले संबंध तोडत असल्याच्या निर्णयाची माहिती दिली. दहशतवादाला समर्थन देण्याव्यतिरिक्त आपल्या अंतर्गत गोष्टींमध्ये कतार ढवळाढवळ करत असल्याचंही बहारिनने सांगितलं आहे. बहारिन आणि सौदी अरेबियाचे अत्यंत चांगले संबंध आहेत.
या चारही देशांनी कतासबोत फक्त राजकीय संबंधच नाही तर हवाई आणि समुद्री संपर्कही तोडण्याची घोषणा केली आहे. बहारिनने कतारमध्ये राहत असलेल्या आपल्या सर्व नागरिकांना परत येण्यासाठी 14 दिवसांची वेळ दिली आहे. सौदी अरबने आपल्या निर्णयाची माहिती देताना दहशतवाद आणि कट्टरपंथीयांपासून बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे.
Saudi Arabia, UAE, Egypt cut ties with Qatar citing "terrorism" and "destabilising state security of the region" as reasons: Reuters— ANI (@ANI_news) June 5, 2017
राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता हा निर्णय घेतला गेल्याचं सौदीमधील अधिकृत न्यू़ज एजन्सीच्या सुत्रांकडून कळलं आहे. सौदीने आपल्या सर्व मित्र देश आणि कंपन्यांना कतारसोबत संपर्क तोडण्याचं आवाहन केलं आहे.
Abu Dhabi-based airline Etihad says it is suspending flights to Qatar amid Gulf diplomatic rift: AP pic.twitter.com/Vy9Z5y3ha4— ANI (@ANI_news) June 5, 2017
युएई आणि इजिप्तनेही कतारसोबत संबंध तोडत असल्याची घोषणा केली आहे. एकीकडे इजिप्तने कतारवर दहशतवादी संघटनांना समर्थ देत असल्याचा आरोप लावला आहे, तर दुसरीकडे युएईने कतार संपुर्ण पश्चिम आशियामध्ये सुरक्षेला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे. बहारिनने आपल्या देशात राहत असलेल्या कतारच्या सर्व नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी दिला आहे. तर कतारने आपल्या राजदूतांना 48 तासांच्या आता बहारिन सोडण्यास सांगितलं आहे.