कोपेनहेगन : स्वीडनच्या दक्षिण भागात एका व्यक्तीने गुरुवारी एका शाळेवर हल्ला केला. यात चार मुले जखमी झाली आहेत. दरम्यान, पोलिसांनी या हल्लेखोराला गोळी मारली. त्यात तो जखमी झाला.पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वीडनचे दुसरे सर्वात मोठे शहर गोटेबोर्गजवळ एका शाळेच्या परिसरात हा हल्ला झाला. यात चार मुले जखमी झाले. स्वीडनच्या संवाद समितीने सांगितले की, या घटनेत एका जणाचा मृत्यू झाला आहे; परंतु नेमका मृत्यू कोणाचा झाला आहे, हे सांगण्यात आले नाही. एका स्थानिक दैनिकाने सांगितले आहे की, या घटनेत चार विद्यार्थी, एक वृद्ध आणि एक हल्लेखोर जखमी झाला आहे. एका दैनिकाच्या वेबसाईटवर व्हिडिओ दाखविण्यात आला आहे. एका लाल रंगाच्या इमारतीच्या बाहेर काही लोक दिसत आहेत. पोलिसांची कार आणि अॅम्बुलन्स यात दिसत आहे. या शाळेत ४०० मुले शिक्षण घेत आहेत. या घटनेने स्वीडनमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून विविध ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.(वृत्तसंस्था)
स्वीडनमध्ये शाळेवर हल्ला; हल्लेखोर जखमी
By admin | Published: October 23, 2015 3:39 AM