आपल्या चार लेकरांच्या हत्येच्या आरोपात गेल्या १८ वर्षांपासून ऑस्ट्रेलियातील तुरूंगात कैद एका महिला सीरिअल किलरच्या सुटकेसाठी तेथील चिकित्सा तज्ज्ञ आणि वैज्ञानिक समोर आले आहेत. या तज्ज्ञांनी दावा केला आहे की, कथितपणे चार लेकरांच्या हत्येसाठी सीरिअल किलर कॅथलीन फोब्लिग दोषी नाही. यामागे त्यांनी ठोस तर्कही दिला आहे.
कॅथलीन पोल्बिग नावाच्या महिलेवर १९९० ते १९९९ दरम्यान आपल्या चार लेकरांच्या हत्येचा आरोप होता. याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर ही महिला २००३ पासून तुरूंगात शिक्षा भोगत आहे. द गार्जियनच्या रिपोर्टनुसार, देशातील साधारण ९० प्रख्यात वैज्ञानिकांनी हस्ताक्षर केलेली एक याचिका ऑस्ट्रेलियाच्या अकादमी ऑफ सायन्स द्वारे जारी करण्यात आली आहे. यात वैज्ञानिकांनी महिलेच्या मुलांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचं म्हटलं आहे.
तज्ज्ञांनी सांगितले की, कॅथलीन फोल्बिगच्या चारही मुलांना दुर्मीळ आनुवांशिक आजार होता. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याचिकेत दुर्मीळ आनुवांशिक आजारांचे मुख्य जगभरातील वैज्ञानिकांचे हस्ताक्षर आहेत. तज्ज्ञ म्हणाले की, दुर्मीळ आनुवांशिक परिवर्तन हे मुलांच्या मृत्यूचं कारण होतं. तज्ज्ञांना आढळलं की, फोल्बिगच्या दोन मुली सारा आणि लॉरा यांच्यात आनुवांशिक उत्परिवर्तनची समस्या होती.
फोल्बिगच्या दोन मुलांमध्ये कालेब आणि पॅट्रिकच्या जीनोममध्ये एक वेगळा दुर्मीळ आनुवांशिक जीनची समस्या आढळली होती. जो उंदरांमध्ये आढळणाऱ्या मिरगीच्या घातक आजारीशी संबंधित आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, पॅट्रिकच्या जन्माच्या चार महिन्यांआधीच त्याच्यात मिरगीचं लक्षण असल्याचं समजलं होतं. तर कालेबला श्वास घेण्यास त्रास होता.
नैसर्गिक कारणांमुळे चार लेकरांना गमावणारी फोल्बिगच्या सुटकेसाठी याचिका न्यू साउथ वेल्सच्या गर्वनरकडे सोपवण्यात आली आहे. कॅथलीन फोल्बिगला आपली चार लेकरं कालेब, पॅट्रिक सारा आणि लॉरा यांच्या हत्ये प्रकरणी तुरूंगात टाकलं होतं. मुलांचं वय १९ दिवस ते १९ महिने दरम्यान होतं. फोल्बिगवर डिप्रेशन दरम्यान आपल्या लेकरांची तस्करी आणि हत्येचा आरोप लावला होता.