लंडन : प्राण्यांमधील ८८७ विषाणूंची एक यादी शास्त्रज्ञांनी तयार केली असून त्यातील ३० विषाणू घातक आहेत. कोरोना साथीमुळे जगाचे जे हाल झाले त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शास्त्रज्ञ आता सतर्क झाले आहेत. प्राण्यांमधील विषाणू माणसांत संक्रमित होऊन कोरोनाची साथ सुरू झाली अशी एक शक्यता वर्तविली जाते. तसेच कोरोना विषाणू चीनने प्रयोगशाळेत तयार करून हवेत मिसळला असावा असाही आरोप होतो. त्याबद्दल अद्याप खात्रीलायक पुरावे मिळाले नसले तरी प्राण्यांतील विषाणूंबाबत जगभरातील शास्त्रज्ञांनी दहा वर्षांपूर्वीपासून अधिक सखोल अभ्यास सुरू केला होता.
विषाणूंच्या अभ्यासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञ जोना मॅजेट यांनी सांगितले की, ज्या तीस विषाणूंची संसर्गशक्ती मोठी आहे, त्यातील काहीच विषाणू अत्यंत घातक असून त्यांच्यामुळे जगभरात साथ येऊ शकते. बाकी विषाणू इतरांच्या तुलनेत कमी घातक असले तरी त्यांच्याबाबतही नेहमी सावधच राहिले पाहिजे. हे विषाणू जगभरात नव्हे मात्र एखादा देश किंवा प्रदेशात हाहाकार माजवू शकतात.प्राण्यांमधील विषाणूंची त्यांच्या संसर्गक्षमतेनुसार शास्त्रज्ञांनी तीन गटांत विभागणी केली आहे. पहिला गट एखाद्या देशात उत्पात घडवू शकणाऱ्यांचा आहे. निम्म्या व संपूर्ण जगात हाहाकार माजवू शकणाºया विषाणूंचे आणखी दोन गट करण्यात आले आहेत.
विषाणूंची तीन गटांमध्ये विभागणीराष्ट्रीय स्तरावर हानी पोहोचवू शकणाऱ्या विषाणूंमध्ये लास्सा, इबोला, मार्बर्ग, एंडिज आदी विषाणूंचा समावेश आहे. निम्म्या विश्वात साथ पसरविण्याची ताकद असलेल्या विषाणूंमध्ये निपाह, सिमियन इम्यूनोडेफिशियन्स, कोरोना विषाणू प्रेडिक्ट, बोर्ना डिजीज, लाँगक्वान आ माऊस कोरोना, मंकीपॉक्स, कोरोना सीओव्ही-२४ या प्रकारच्या विषाणूंचा समावेश आहे.