काबूल : अफगाणिस्तान सरकार व तालिबान प्रतिनिधी यांच्यातील शांतता चर्चेची दुसरी फेरी ३० जुलैला चीनमध्ये होणार आहे, अशी माहिती अफगाण अधिकाऱ्याने दिली. उच्च शांतता परिषदेचे मोहंमद इस्माईल कासिमयार यांनी सांगितले की, आम्ही तालिबानसोबत शस्त्रसंधी करू इच्छितो आणि तालिबान नेतृत्वाचे शस्त्रसंधीचे निर्देश त्यांचे लोक स्वीकारू इच्छितात की नाही हे यातून कळून येईल, असेही ते म्हणाले. अफगाण आणि तालिबान प्रतिनिधींमध्ये पहिली चर्चा सात जुलै रोजी इस्लामाबाद, पाकिस्तान येथे झाली होती. (वृत्तसंस्था)
अफगाण-तालिबान चर्चेची दुसरी फेरी ३० रोजी चीनमध्ये
By admin | Published: July 25, 2015 1:13 AM