वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. यातच, येणारे थंडीचे दिवस अमेरिकेसह अनेक देशांसाठी परीक्षेचे ठरू शकतात. या दिवसांत कोरोना व्हायरस आतापेक्षाही अधिक प्रभावी आणि घातक रूप धारण करू शकतो. त्यामुळे, या काळात कोरोनावर लगाम घालणे अधिक कठीन जाऊ शकते, असा इशारा अमेरिकेच्या सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) दिला आहे.
सीडीसीचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी वॉशिंग्टन पोस्टला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी, याणेरे थंडीचे दिवस हे जगासाठी विनाशकारी ठरू शकतात. कार हे दिवसही फ्लूसाठी अनुकूल असतात. विशेष म्हणजे दोघांची लक्षणेही सारखीच असल्याने त्यांची ओळख होणे अधिक कठीन जाईल. तसेच या काळात अमेरिकेची स्थिती अधिक विध्वंसक होऊ शकते. सर्वात धोकादायक म्हणजे, फ्लू महामारी आणि कोरोना व्हायरस महामारी एकाचवेळीही होऊ शकते.
कोरोनाची दुसरी लाट असेल अधिक घातक - कोरोना व्हायरसची पहिली लहर अमेरिकेत आली तेव्हा अमेरिकेतील फ्ल्यूचा सिझन जवळजवळ संपलेला होता, हे अमेरिकेचे नशीब आहे. खरेतर, कोरोनावर व्हॅक्सीन नसल्याने थंडीच्या दिवसांत अधिक कठीन परिस्थिती निर्माण होईल. या दिवसांत फ्लू आणि कोरोनाचे रुग्ण अचानक वाढतील. यामुळे हेल्थ केयर सिस्टिमवर किती ताण येईल हे सांगणे अवघड आहे, असे सीडीआयचे संचालक रॉबर्ट यांनी म्हटले आहे.
रॉबर्ट म्हणले, यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करायला हवी. यासंदर्भात प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गल्लीत, सूचना द्यावी लागेल आणि गाइडलाईन तयार करावी लागेल. व्हाइट हाऊसमधील कोरोना टास्क फोर्समधील डॉक्टर डेबोरा ब्रिक्स यांनीही, कोरोनाची दुसरी लाट येण्याची लक्षणे आतापासूनच दिसत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अशा टेस्ट किट तयार करण्यावर काम सुरू आहे. ज्या एकाच वेळी फ्ल्यू आणि कोरोना या दोन्ही आजारांचे निदान करू शकतील.
आमेरिकेतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता आठ लाखांवर पोहचला असून मृत्यूचा आकडा 44 हजारवर गेला आहे. येथे गेल्या 24 तासांत 2,700 हून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.