ऑनलाइन लोकमत
सौदी अरेबिया, दि. ३ - एका महिलेने सौदी अरेबियाच्या राजाच्या संपत्तीतील हिस्सा मिळविण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगऴवारी न्यायालयात सुनावणी झाली.
जॉनन हर्ब असे या महिलेचे नाव असून तिने सौदी अरेबियाच्या फहद राजासोबत गुप्त विवाह केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी या राजाचे निधन झाले. त्यानंतर जॉनन हर्बने राजाच्या संपत्तीतील काही हिस्सा आपल्याला मिळावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला राजाच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा प्रिन्स अब्दुल अझीझ याने विरोध केला होता. या याचिकेवर न्यायालयाने जॉनन हर्बच्या बाजूने निकाल देत राजाच्या संपत्तीतील १५ दशलक्ष पौंड आणि लंडन येथे असलेल्या संपत्तीतील काही भाग तिला देण्यास सांगितले.
पॅलेस्टीनमध्ये जन्मलेल्या जॉनन हर्बने १९६८ मध्ये १९व्या वर्षी सौदी अरेबियाच्या राजाने तिच्याशी गुप्त पद्धतीने विवाह केला होता.