ओबामा : अवैधरीत्या सीमेपलीकडून आलेल्या मुलांना मायदेशी परत पाठविणार असल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. मध्य अमेरिकी देशांच्या नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ओबामा म्हणाले, ‘अनेक परिवार योग्य दस्तऐवजाशिवाय आपल्या मुलांना घेऊन अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मात्र, एक कायदेशीर पद्धत, मानवीय प्रारूप व उचित प्रक्रियेनुसार, अवैधरीत्या देशात आलेल्यांना एक ना एक दिवस आपल्या मायदेशी परतावेच लागेल.’ तथापि, सामूहिक जबाबदारीतूनच ही समस्या सोडविली जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्वांटेमाला, होंडुरास आणि अल साल्वाडोर या देशांच्या राष्ट्राप्रमुखांशी ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये बातचीत झाली. यावेळी अवैध स्थलांतर विशेषत: मुलांच्या मुद्यावर चर्चा झाली. ग्वांटेमालाच्या राष्ट्राध्यक्षांनी या समस्येच्या मुळाशी जाण्याच्या गरजेवर भर दिला. भीषण दारिद्रय़ व रोजगाराच्या संधींचा अभाव हे याच्या मुळाशी असल्याचे ते म्हणाले.
अमेरिकी जनता आणि प्रशासन यांच्या मनात या मुलांबाबत मोठे दातृत्व आहे. इतर मुलांप्रमाणोच यांचीही देखभाल ठेवली जावी, अशी आपली भावना असल्याचे ओबामा यावेळी म्हणाले. अवैधरीत्या आलेल्या मुलांच्या देखरेखीसाठी अमेरिकी सरकारला लाखो डॉलर खर्च करावा लागतो. यावरून अमेरिकी संसदेत सरकारवर गेल्या काही काळापासून टीका होत आहे. व्हाईट हाऊसकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी या समस्येवर अमेरिकी सरकारकडून एकूण 3.7 अब्ज डॉलर खर्च होतो.
यामध्ये 1.8 अब्ज डॉलर या मुलांच्या योग्य सुविधांसाठी, 1.1 अब्ज डॉलर ताब्यात घेणो व परत पाठवण्यासाठी, 433 दशलक्ष डॉलर सीमा सुरक्षा आणि गस्तीसाठी, 333 दशलक्ष डॉलर मध्य अमेरिकी देशांना या समस्येच्या उच्चटन करण्यासाठी खर्च केले जातात. (वृत्तसंस्था)
64 दशलक्ष डॉलर स्थलांतर न्यायालय, अतिरिक्त न्यायाधीश गेल्या ऑक्टोबरपासून आतार्पयत अवैधरीत्या आलेल्या 5क् हजारांहून अधिक मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
म्हणून मी सांगत आहे - ओबामा
4जी मुले अवैधरीत्या सीमेपलीकडून अमेरिकेत आली आहेत, त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठविले जाईल. त्यांच्याबद्दल माङय मनात कोणतीही आपुलकी नाही असे नाही, तर विस्थापितांचा एक देश असण्याशिवाय अमेरिका असे राष्ट्र आहे, जेथे कायद्याचेही राज्य आहे, असे बराक ओबामा म्हणाले.