जगातील सगळ्यात जुनी लोकशाही असा लौकिक असलेल्या अमेरिकी लोकशाहीसाठी बुधवारचा दिवस सर्वांत काळाकुट्ट ठरला. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे आता अमेरिकेची सूत्रं जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. आंदोलकांनी चार तास संसद वेठीस धरली होती. यानंतर ट्रम्प यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे. भारतानं देखील या घटनेचा निषेध केला होता. दरम्यान भारतीय गीतकार जावेद अख्तर यांनीदेखील ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "डोनाल्ड ट्रम्प हे असभ्यतेची कोणतीही पायरी सोडत नाहीत हे खरं आहे. ते किती खुज्या मनोवृत्तीचे आहेत हे ते आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला हे स्वीकारलं पाहिजे आणि त्यांना यासाठी १०० पैकी १०० गुण दिले पाहिजे," असं जावेद अख्तर म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर संताप व्यक्त केला. तसंच त्यांनी अमेरिकेच्या संसंदेत झालेल्या हिंसाचाराचा निषेधही केला.
ट्रम्प असभ्यतेची कोणतीच पायरी सोडत नाहीत; जावेद अख्तर यांची टीका
By जयदीप दाभोळकर | Published: January 09, 2021 1:20 PM
बुधवारचा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील ठरला होता काळा दिवस, ट्र्म्प समर्थकांनी संसद इमारतीत केला होता हिंसाचार
ठळक मुद्देबुधवारी ट्रम्प समर्थकांची पराभवाच्या पार्श्वभूमीवर संसंद इमारतीत केला होता हिंसाचारजगभरातील अनेकांनी केला घटनेचा निषेध