Serbia School Shooting: सर्बियाची राजधानी बेलग्रेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शाळेत बुधवारी एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्त्यांवर बेछूट गोळीबार केला. यात एकाच वर्गातील 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिक्षक गंभीर जखमी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा गोळीबार एका 14 वर्षीय मुलाने केला आहे. तो 7वीत शिकतो. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शाळा रिकामी करून सील केली आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्यांसह काही शिक्षकही जखमी झाले आहेत. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो पकडला गेला. सर्बियाच्या गृहमंत्रालयाने या घटनेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपी त्याच शाळेत शिकतोपोलिसांनी सांगितले की, आरोपी हा याच शाळेत इयत्ता सातवीत शिकतो. गोळीबार केल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याला शाळेबाहेरून अटक करण्यात आली. शाळा व्यवस्थापनाने म्हटले की, ही घटना कशामुळे घडली हे आम्हाला माहित नाही. आरोपीचा शाळेतील ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. काही दिवसांपूर्वीच तो या शाळेत आला होता. त्याने असे का केले, याचा तपास पोलीस करत आहेत.
बंदूक कुठून आणलीसर्बियामध्ये अशा घटना घडत नाहीत. त्यामुळे येथील लोक खूप चिंतेत आहेत. देशात बंदुकांनाही परवानगी नाही. आरोपीने ही बंदूक कुठून आणली, याचा तपास सुरू आहे.