ऑनलाइन लोकमत
सिरिया, दि. 30 - सिरियाचे शासन व बंडखोरामध्ये झालेल्या युद्धबंदी करारास मान्यता देण्यात आली असून गुरुवारी रात्री १0 वाजेपासून युद्धबंदी अमलात आली आहे.
युद्धबंदीचा करार झाला असल्याची घोषणा रशियाचे अध्यक्ष ब्लादीमोर पुतीन यांनी केली तर त्याची खातरजमा तुर्कीतर्फे करण्यात आली. सिरिया सरकार व बंडखोरांना पाठबळ देणाऱ्या या दोन्ही देशांनी कराराच्या अंमलबजावणीची हमी घेतली आहे.