शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्यास गंभीर परिणाम; रशियाचा अमेरिका, नाटो देशांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 7:02 AM

यासंदर्भात एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका युक्रेनला लष्करी हेलिकॉप्टर, हॉवित्झर तोफा, अत्याधुनिक लष्करी वाहने अशी विविध प्रकारची ६१ अब्ज रुपयांची संरक्षण सामग्री देणार आहे.

कीव्ह :  युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व इतर लष्करी साधनांचा अमेरिका, नाटो देशांनी पुरवठा केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाने दिला आहे. ही शस्त्रास्त्रे पुरवून हे देश आगीत आणखी तेल ओतत आहेत, असाही आरोप रशियाने केला. यासंदर्भात एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका युक्रेनला लष्करी हेलिकॉप्टर, हॉवित्झर तोफा, अत्याधुनिक लष्करी वाहने अशी विविध प्रकारची ६१ अब्ज रुपयांची संरक्षण सामग्री देणार आहे. त्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याच आठवड्यात केली होती. त्यानंतर काही दिवसांनी रशियाने याबाबत अमेरिका व नाटो देशांना इशारा दिला. अमेरिकी सरकारने म्हटले आहे की, युक्रेनला पाश्चिमात्य देश मोठ्या प्रमाणावर संरक्षण सामग्रीचा पुरवठा करत आहेत. त्याचा युक्रेनच्या लष्कराकडून प्रभावी वापर सुरू आहे. रशियाने युक्रेनमध्ये नरसंहार घडवला आहे. पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला मिळणारी मदत पाहून रशिया संतापला असून, भविष्यात तो अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यताआहे. रशियाने युक्रेनमधील डोनबास प्रांताला आता लक्ष्य केले असून, तेथे सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव केली आहे. त्या हल्ल्यांना रोखण्यासाठी युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा उपयोग होईल. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की व जो बायडेन यांच्यात अतिरिक्त लष्करी मदतीसंदर्भात चर्चा झाली होती. कीव्हमध्ये आतापर्यंत ९०० जण ठाररशियाने कीव्ह परिसरात केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ९००हून अधिक जण ठार झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. त्यांचे मृतदेह रेल्वे स्थानक, इमारतींची तळघरे अशा अनेक ठिकाणी सापडले. त्यातील बहुतांश लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. काळ्या समुद्रातील रशियन नौदलाची मोस्कवा युद्धनौका युक्रेनच्या लष्कराने क्षेपणास्त्रांचा मारा करून बुडवली. तो रशियासाठी मोठा धक्का होता. त्यानंतर रशियाने पुन्हा कीव्हवर जोरदार हल्ले करण्याची घोषणा केली आहे. 

रशियाच्या तेल निर्यातीवर बंदी घाला -रशियावर घातलेले निर्बंध वेदनादायी असले तरी शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते पुरेसे नाहीत. त्याच्या तेल निर्यातीवर जगातील सर्व लोकशाही देशांनी संपूर्ण बंदी घातली पाहिजे. त्यामुळे रशियाची कोंडी होऊन युद्ध थांबू शकेल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाच्या तेलावर याआधीच बंदी लागू केली आहे.  युरोपमधील अनेक देशांना रशिया तेलाचा पुरवठा करतो. भारताने रशियाकडून तेल घेऊ नये, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. 

खारकीव्हमध्ये दहा ठार -खारकीव्ह शहरामध्ये रशियाने शनिवारी केलेल्या माऱ्यात १० जणांचा मृत्यू झाला. त्यात सात महिन्यांचा एक मुलगाही आहे. कीव्हमध्ये रशियाच्या हल्ल्यात युक्रेन लष्कराच्या एका दारुगोळा कारखान्याचे मोठे नुकसान झाले. 

बोरिस जॉन्सन यांना रशियाची प्रवेशबंदी -ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन व त्यांच्या मंत्रिमंडळातील भारतवंशीय मंत्री ऋषी सुनक, प्रीती पटेल आदी मंत्र्यांना रशियाने प्रवेशबंदी केली आहे. युक्रेन युद्धामुळे ब्रिटनने रशियावर काही निर्बंध लादले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने हा निर्णय घेतला आहे. रशियाने सांगितले की, ब्रिटनच्या ॲटर्नी जनरल सुएला ब्रेव्हमन, उपपंतप्रधान डोमिनिक राब, परराष्ट्र मंत्री लिझ ट्रूस, संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनाही रशियात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 

या यादीत नजीकच्या काळात ब्रिटनमधील आणखी काही राजकीय नेते तसेच खासदार यांच्या नावांची भर पडणार आहे असे सूचक विधानही रशियाने केले. युक्रेन युद्धामुळे रशियाच्या सर्वोच्च नेत्यांवर निर्बंध लादण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिकाEnglandइंग्लंडwarयुद्ध