मिन्स्क (बेलारूस) : पूर्व युक्रेनमधील संकटावर सर्वसमावेशक शांतता कराराची घोषणा गुरुवारी रशिया, युक्रेन, फ्रान्स आणि जर्मनीने केली. तब्बल १६ तास चाललेल्या चर्चेनंतर तयार झालेला हा करार युक्रेन आणि रशिया समर्थक बंडखोरांना कितपत मान्य आहे, हा प्रश्नच आहे.रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी वार्ताहरांना सांगितले की, या करारानुसार युद्धविराम रविवारपासून सुरू होईल, अशी कल्पना आहे. या करारात बंडखोरी असलेल्या भागाला विशेष दर्जा व सीमेवरील नियंत्रणाची तरतूदही आहे. युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी पूर्व युक्रेनला स्वायतत्ता देण्याचा कोणताही करार केल्याचा इन्कार केला. पूर्व युक्रेनमध्ये गेल्या एप्रिलपासून सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत ५,३०० जण ठार झाले आहेत. (वृत्तसंस्था)
पूर्व युक्रेनच्या संकटावर शांतता कराराचा तोडगा
By admin | Published: February 12, 2015 11:08 PM