शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

सात प्रवाशांचा उभ्याने विमान प्रवास; सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Published: February 27, 2017 4:36 AM

सात प्रवाशांनी कराची ते मदिना हा तीन तासांचा प्रवास उभे राहून केल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर, कंपनीने या प्रकाराची चौकशी सुरू केली

इस्लामाबाद : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) या पाकिस्तानच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या विमानातून गेल्या महिन्यांत सात प्रवाशांनी कराची ते मदिना हा तीन तासांचा प्रवास उभे राहून केल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर, कंपनीने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.‘डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या २० जानेवारी रोजी ‘पीआयए’चे बोइंग ७७७ विमान कराचीहून मदिनासाठी रवाना झाले, तेव्हा त्यात क्षमतेपेक्षा सात जादा प्रवासी कोंबण्यात आले होते. अर्थात, या प्रवाशांना बसण्यासाठी आसने उपलब्ध नसल्याने त्यांनी आसनांच्या रांगांमध्ये असलेल्या मोकळ््या जागेत उभे राहून हा प्रवास केला.या विमानाची आसनक्षमता, विमान कर्मचाऱ्यांसाठी असलेली आसने धरून ४०९ आहे. सर्व तिकिटे विकली गेलेली होती व सर्व प्रवासी आपापल्या आसनावर बसलेले होते. ‘डॉन’च्या वृत्तानुसार विमान सुटण्याच्या थोडा वेळ आधी विमानतळावर काम करणाऱ्या कंपनीच्या ट्रॅफिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सात जादा प्रवाशांना हाती लिहिलेले बोर्डिंग पास बनवून दिले व विमानात पाठविले. विमानाचे वैमानिक अन्वर अदिल म्हणाले की, ‘विमानतळाच्या चेक-इन काउंटरवर काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या जादा प्रवाशांना, केबिन क्रुसाठी असलेल्या ‘जम्प सीट’वर बसून प्रवास करू द्यावा, अशी मला विनंती केली होती, परंतु मी त्यास साफ नकार दिला होता.’कॅप्टन अदिल म्हणाले की, ‘विमानाचे उड्डाण झाल्यावर मी कॉकपीटमधून बाहेर आलो, तेव्हा मला मार्गिकांमध्ये उभे असलेले हे प्रवासी दिसले. मी फ्लाइट पर्सरकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी ट्रॅफिक कर्मचाऱ्यांनी हे जादा प्रवासी विमानात कोंबल्याचे सांगितले.’ कॅप्टन अदिल म्हणाले की, ‘ही गोष्ट लक्षात आली, तोपर्यंत विमान उंच आकाशात उडालेले होते व त्याने निर्धारित मार्ग धरलेला होता. विमान परत मागे वळवून कराचीला उतरवायचे म्हटले असते, तर वेळेसोबत बरेच इंधनही वाया गेले असते. म्हणून या जास्त प्रवाशांना खाली न उतरविता विमान तसेच पुढे मदिनापर्यंत नेण्यात आले.’ एके काळी उत्तम सेवेसाठी ख्याती असलेली ‘पीआयए’ आता आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली आहे, तसेच तिचे व्यवस्थापनही पार खिळखिळे झाले आहे. ‘डॉन’च्या या वृत्तानंतर कंपनीने हा प्रकार घडल्याची कबुली दिली असून, याची चौकशी करून जबाबदार ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)>सुरक्षेला मोठा धोका विमानात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे आणि त्यांनी उभ्याने प्रवास करणे हा हवाई सुरक्षेच्या दृष्टीने फार मोठा धोका मानला जातो. काही आणीबाणीचा प्रसंग उद््भवला, तर अशा उभ्या असलेल्या प्रवाशांना आॅक्सिजन मास्क पुरविला जाऊ शकत नाही. शिवाय त्यांच्या उभे राहण्याने मार्गिकेत अडथळा येत असल्याने प्रवाशांना बाहेर काढायची वेळ आली, तर त्यातही मोठी अडचण होऊ शकते.