तेहरान : इराण-इराकच्या सीमेवर रविवारी रात्री बसलेल्या ७.३ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने दोन्ही देशांतील ३३० पेक्षा जास्त लोक ठार, तर ४,४८५ पेक्षा जास्त जखमी झाले. रात्रीच असंख्य लोकांनी भीतीतून घरे सोडली होती.भूकंपाचा सगळ्यात मोठा फटका इराणच्या पश्चिमेकडील केरमानशाह प्रांताला बसला. तेथे ३२८ जण ठार झाले, असे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले. भूकंपाचा धक्का बसला, तो इराणचा ग्रामीण व डोंगराळ भाग आहे.इराकच्या उत्तरेकडील कुर्दीश प्रांतात या भूकंपात सात जण ठार, तर ५३५ जखमी झाले, असे इराकच्या अंतर्गत मंत्रालयाने म्हटले.
इराण-इराक सीमेवर भीषण भूकंप; ३३० ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 3:25 AM