New Law for Sex Workers: सेक्स वर्कर्सबाबत देशातील विविध देशांमध्ये वेगवेगळे कायदे करण्यात आले आहेत. पण कायदे करण्यात आले असले तरीही त्यांच्या जीवनपद्धतीत फारसा बदल झाल्याचे दिसत नाही. सेक्स वर्कर्ससोबत बरेच वेळा भेदभावाची वागणूक केली जाते. पण हाच भेदभाव संपवण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन सरकारने एक पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने सेक्स वर्कर्स संदर्भात एक कायदा केला आहे. या नव्या कायद्यामुळे त्यांच्या जीवनपद्धतीत सुधारणा होईल असा विश्वास ऑस्ट्रेलियन सरकारने व्यक्त केला आहे. या नव्या कायद्यानुसार, सेक्स वर्कर्स आपल्या क्लायंटशी सार्वजनिक ठिकाणी भेटू शकतील. या नव्या कायद्यामुळे, सेक्स वर्कर्सना ज्या भेदभावाचा सामना करावा लागतो, त्यात घट होईल. या नवा कायदा ऐतिहासिक आणि सुधारणावादी पाऊल ठरेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
कायदा केव्हापासून लागू होणार?
ऑस्ट्रेलियन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हा कायदा मंगळवारपासून लागू होणार आहे. या कायद्यामुळे सेक्सवर्कर्स संबधीच्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींना कायदेशीर मान्यता मिळू शकणार आहे. या कायद्याच्या स्वरूपाबाबत बोलताना सरकारने हेदेखील स्पष्ट केलं आहे की हा कायदा केवळ कमी वस्तीच्या ठिकाणासाठीच वैध असेल.
कायदेतज्ञ्जांचे मत काय?
सरकारचे हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा कायदा मंजूर झाल्यामुळे सेक्स वर्कर्सचे जीवन आणि त्यासंबंधीचे उद्योग सुरक्षित होतील. सरकारचे म्हणणे आहे की, हा कायदा लागू केल्याने, या संबंधित कार्य उद्योगातील लोक त्यांच्यावरील भेदभाव आणि गुन्ह्यांविरोधात उघडपणे समोर येतील आणि पूर्ण अधिकारांची माहिती घेऊन मदतीची मागणी करू शकतील.