शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 5:08 PM

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांची निवड करण्यात आली आहे.

लाहोर, दि. - पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांची निवड करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधु शहाबाज शरीफ यांची संसदेमध्ये निवड होईपर्यंत शाहीद अब्बासी पंतप्रधानपदाची जबाबदारी संभाळतील. त्यानंतर शहाबाज शरीफ पाकिस्तानची सूत्रे आपल्या हाती घेतील. नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पीएमएल-एन पक्षाच्या दोन बैठका पार पडल्या. त्यात पक्षातील नेत्यांनी शहाबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड केली. नवाझ शरीफ यांच्या पक्षाकडे संसदेत बहुमत असल्याने तूर्तास तरी सरकारला कुठलाही धोका नाही. 

शाहीद अब्बासी पुढचे 45 दिवस पाकिस्तानचे पंतप्रधान असतील. सध्याच्या सरकारमध्ये अब्बासी पेट्रोलियम मंत्री आहेत. याआधी पीएमएल-एनचे नेते आणि शरीफ कुटुंबियांचे माजी संरक्षण मंत्री ख्वाजा महोम्मद असीफ यांना पंतप्रधानपदी बसविण्यावर एकमत झाले होते. पण आता शाहीद अब्बासी यांची निवड झाली आहे. 

नवाज शरीफ हे पनामागेट या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात दोषी असून, ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहू शकत नाहीत, असा आदेश येथील सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे नवाज शरीफ यांना नाइलाजाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. नवाज शरीफ यांच्या कुटुंबीयांनाही न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरविले आहे. 

नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाझ शरीफ यांचे नाव सर्वात पुढे आहे. किंबहुना त्यांनी पंतप्रधान व्हावे, अशी नवाज शरीफ यांची इच्छा आहे. ते सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत आणि नॅशनल असेंब्लीचे ते सदस्य नसल्याने त्यांना लगेचच पंतप्रधान होता येणार नाही. त्यामुळे शाहबाझ नॅशनल असेंब्लीवर निवडून येईपर्यंत नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील एखाद्याकडे सूत्रे सोपवावीत, असा विचार पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पक्षामध्ये सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवाज शरीफ यांनी कुरकुर करीतच राजीनामा दिला. न्यायालयाने सांगितले म्हणून आपण राजीनामा देत आहोत, पण आपण काहीही गैर केलेले नाही, असे शरीफ म्हणाल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला कुठेच आव्हान देणे शक्य नसल्याने त्यांनी नाइलाजाने राजीनामा दिला.

नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा गैरवापर करून आणि मनी लाँडरिंंगद्वारे लंडन व अन्यत्र ज्या मालमत्ता विकत घेतल्या, त्या पनामागेट प्रकरणातून उघडकीस आल्या होत्या. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या मालमत्तांचाही पनामागेटमध्ये उल्लेख होता. शरीफ यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केल्यानंतर इम्रान खान यांच्या तेहरिक-ए- इन्सान या पार्टीतर्फे तसेच अन्य संघटनांतर्फे शरीफ यांच्या पनामागेट प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी याचिका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमले.