तेल अवीव/तेहरान : दक्षिण इस्रायलवरील हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे भाषण सुरू असतानाच आंदोलकांनी व्यत्यय आणला. नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या घोषणांमुळे नेतन्याहू यांना भाषण लगेचच थांबवण्यास भाग पाडले गेले. घोषणाबाजी करणारे लोक हमासच्या हल्ल्यात मारले गेलेल्यांचे नातेवाइक होते.
हमासचा हल्ला रोखता न आल्याबद्दल अनेक लोक नेतान्याहूंना दोष देतात. इस्रायल आणि इराणचे नेते माघार घेण्यास तयार नाहीत. एकीकडे, इराणला खूप माेठे नुकसान पाेहाेचविले असून, आमचे उद्दीष्ट साध्य झाले, असा दावा नेतान्याहू यांनी केला, तर दुसरीकडे इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी इस्रायलच्या हल्ल्यांचे अतिरंजीत वर्णन करायला नकाे, असे सांगून इराणच्या तरुणांच्या इच्छाशक्तीला समजावून सांगावे लागेल, असा इशाराही दिला आहे.
खामेनी काय म्हणाले?इस्रायलने हल्ल्याचे अतिरंजीत किंवा कमी वर्णन करू नये. इराण आणि इराणच्या तरुणांची इच्छाशक्ती समजावून सांगावी लागेल. इस्रायल सरकारचे गैरसमज दूर करायला हवे. तसेच राष्ट्र हितांची पूर्तता करणारी कारवाई कशी करावी, हे सांगणे अधिकाऱ्यांच्या हाती आहे. युद्ध भडकण्याची भीती खामेनी यांनी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याबाबत काेणतेही स्पष्ट वक्तव्य केले नाही. याशिवाय इराणच्या अधिकाऱ्यांनीही प्रतिहल्ल्याचे संकेत देणे टाळले. गाझा आणि लेबनाॅनमध्ये युद्धविरात काेणत्याही प्रत्त्युत्तरापेक्षा महत्त्वाचा आहे. इस्रायल कधीतरी हल्ला करणार, हे सर्वांनाच माहिती हाेते. या हल्ल्यानंतर आखातात माेठे युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हल्ल्यात महिला वैमानिकही- इराणवर शनिवारी पहाटे झालेल्या हल्ल्यांत इस्रायलच्या महिला लढाऊ वैमानिकांनीही सक्रिय सहभाग घेतला हाेता. - इस्रायलच्या लष्कराने यासंदर्भात काही व्हिडीओ आणि छायाचित्रे जारी केली आहेत. त्यात महिला वैमानिक लढाऊ विमानांमध्ये बसून माेहिमेवर जाताना दिसतात.- एफ-१५, एफ-१६ आणि एफ-३५ विमानांचा वापर करताना आपल्या तळापासून १,६०० किलाेमीटर अंतरावर जाऊन लक्ष्यांचा वेध या महिला वैमानिकांनी घेतला.
गाझामध्ये २२ ठारइस्रायलने उत्तर गाझामध्ये भीषण हवाई हल्ले केले. त्यात २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. शनिवारी रात्री उशिरा हे हल्ले करण्यात आले.