ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 11 - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सरकार आणि लष्करामधील झालेल्या बैठकीसंदर्भात बातमी छापणा-या पाकिस्तानी पत्रकाराला देशबाहेर जाण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र 'डॉन'चे पत्रकार सायरिल अलमिडा यांच्यावर देशबाहेर जाण्यास नवाज शरीफ सरकारने बंदी घातली आहे. अलमिडा यांनी छापलेल्या बातमीतून, पाकिस्तानी सरकार आणि लष्करात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा सरकारकडून करण्यात येते आहे. शिवाय ती बातमी बनावट असल्याचेही सांगण्यात येत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय दहशतवाद्यांचे समर्थन करत असल्याने पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटा पडत आहे, अशी बातमी या पत्रकाराने दिली होती.
ही बातमी छापल्यामुळे, सायरिल यांचे नाव 'एग्झिट कंट्रोल लिस्ट'मध्ये टाकण्यात आले आहे. यासंदर्भात ट्विट करत सायरिल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'माझा एग्झिट कंट्रोल लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.ब-याच महिन्यांपासून मी सहलीवर जाण्याचा विचार करत होतो. काही गोष्टींसाठी मी कधीही माफ करणार नाही. गोंधळात आहे, दुःखी झालो आहे, हे माझे घर आहे, पाकिस्तान', हे माझे आयुष्य आहे, माझा देश आहे, काय चुकतंय?,असा संताप त्यांनी पाकिस्तान सरकारविरोधात व्यक्त केला आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात कथिक बातम्या छापण्यांविरोधात कठोरातील कठोर कारवाई करावी, असा आदेश सोमवारी जारी केला आहे. या आदेशांतर्गतच अलमिडांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात अलमिडा यांनी 'डॉन'च्या पहिल्या पानावर, पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात दहशतवादावरुन दरी निर्माण झाली आहे. मात्र, हेच दहशतवादी समूह भारत आणि अफगाणिस्तानविरोधात दहशतवादी कारवाई करतात, अशी अशी बातमी अलमिदा यांनी छापली होती. याच पार्श्वभूमीवर, लष्कराकडून दहशतवादाला मिळणा-या कथित समर्थनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव वाढतोय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकटा पडतोय, असे नवाज शरीफ सरकारने लष्कराच्या नेतृत्वाला म्हटले होते, अशी बातमी अलमिदा यांनी सूत्रांचा हवाला देत छापली होती. दरम्यान, पाकिस्तानच्या सरकारने हे वृत्त कथित असल्याचे सांगत, ही बातमी आतापर्यंत तीनदा फेटाळून लावली आहे.
I am told and have been informed and have been shown evidence that I am on the Exit Control List.— cyril almeida (@cyalm) October 10, 2016
Was a long-planned trip, for at least several mths now. There are certain things that I will never, ever forgive.— cyril almeida (@cyalm) October 10, 2016
Puzzled, saddened. Had no intention of going anywhere; this is my home. Pakistan.— cyril almeida (@cyalm) October 11, 2016
I feel sad tonight. This is my life, my country. What went wrong.— cyril almeida (@cyalm) October 10, 2016