शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

शरीफ यांना पुन्हा 24 तासांची मुदत

By admin | Published: August 31, 2014 1:53 AM

लष्कराच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांनंतर विरोधकांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांना राजीनामा देण्यासाठी शनिवारी आणखी एकदा 24 तासांची मुदत दिली.

इस्लामाबाद : लष्कराच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांनंतर विरोधकांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांना राजीनामा देण्यासाठी शनिवारी आणखी एकदा 24 तासांची मुदत दिली. 
संघर्षासाठी तयार असलेल्या शरीफ सरकारला पाकिस्तान अवामी तेहरिकचे  (पीएटी) प्रमुख मौलवी ताहिरूल कादरी यांनी ही मुदत दिली. शुक्रवारी रात्री उशिरा कादरी यांची इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना तुम्ही पुढील पाऊल सध्याच उचलू नका, असे पटवून दिले. 14 ऑगस्टपासून इम्रान खान व मौलवी कादरी यांनी नवाज शरीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलेली आहे. 
गेल्या 15 दिवसांत खान व कादरी यांच्या गटांची ही पहिलीच बैठक होती. कादरी यांनी यापूर्वीही शरीफ यांना अनेक वेळा राजीनाम्यासाठी मुदत दिली होती. कादरी यांनी या बैठकीनंतर पीएटीच्या समर्थकांसमोर भाषण करून खान यांनी केलेली मागणी सांगितली. ही मागणी समर्थकांनी फेटाळून लावली. त्यानंतर कादरी यांनी खान यांच्या मागणीला पाठिंबा देण्याची विनंती त्यांना केली. कादरी म्हणाले, पीएटी आणि पीटीआयचे उद्देश व दृष्टिकोन बरेचसे सारखेच आहेत, दोघांचाही संघर्ष एकाच कारणासाठी आहे त्यामुळे सरकार आपणा दोघांमध्ये फूट पाडू इच्छिते.’’
इम्रान खान यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केलेल्या भाषणात त्यांचा पक्ष लाहोर, कराची, फैसलाबाद आणि मुलतानमध्येही धरणो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. खान यांच्या या आंदोलनात सहभागी व्हा, असे कादरी यांनी आपल्या समर्थकांना सांगितले. 
पार्लमेंटच्या बाहेर इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांशी बोलताना मी माङो पुढचे पाऊल काय असेल याची घोषणा रविवारी करणार असल्याचे सांगितले. शरीफ सरकारने निवडणूक सुधारणांशी संबंधित सगळ्या मागण्या मान्य केल्या; परंतु नवाज शरीफ यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी फेटाळून लावली आहे. (वृत्तसंस्था)
 
4सरकार आणि निदर्शकांमध्ये शुक्रवारी झालेली थेट चर्चा अपयशी ठरल्यानंतर या घडामोडी घडल्या. कादरी आणि खान यांनी लष्कर प्रमुखांची गुरुवारी रात्री भेट घेतल्यानंतर पडद्यामागे लष्कर सक्रिय झाले आहे.