शांघाई : या सुंदर तरुणीचे नाव आहे जिया, पण ही एक रोबो आहे, असे सांगितले, तर कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र, हे वास्तव आहे. मानवी चेहऱ्याशी नाते सांगणारा हा ‘स्मार्ट’ रोबो सद्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. चीनमधील युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीतील इंजिनीअरिंगच्या एका टीमने हा रोबो तयार केला आहे. चेन जियाओपिंग हे या टीमचे प्रमुख आहेत. शांघाईत एका आर्थिक संमेलनात हा रोबो प्रत्येकाचे लक्ष आकर्षून घेत होता. चेन यांनी अशी भविष्यवाणी केली आहे की, आगामी दशकात हा रोबो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर चीनमधील रेस्टॉरंट, नर्सिंग होम, हॉस्पिटल आणि घरांमध्ये आपले स्थान मजबूत करेल. या पाच-दहा वर्षांत या रोबोची मागणीही वाढेल, असा दावा त्यांनी केला आहे. पारंपरिक चीन पोषाख आणि काळ्या केसातील हा रोबो अतिशय आकर्षक आहे. अगदी प्रथम लक्ष जाताच या रोबोटवर नजर खिळून राहते. चीनमध्ये समृद्धी वाढत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम करणारे मानवी हात भविष्यात कमी होऊ शकतात, पण त्याचसाठी हुबेहूब मानवासारखाच हा रोबो मानवाची कमतरता भरून काढू शकतो.
‘ती’ आहे स्मार्ट रोबो
By admin | Published: January 13, 2017 12:45 AM